Tuesday, April 30, 2024

Latest Posts

RCBvsMI, विराट कोहली आणि रोहित शर्मा आमनेसामने, कोण मारणार बाजी

आयपीएल २०२३ (IPL 2023) मधील आजचा सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) या दोन संघांमध्ये लढत पाहायला मिळणार आहे.

आयपीएल २०२३ (IPL 2023) मधील आजचा सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) या दोन संघांमध्ये लढत पाहायला मिळणार आहे. भारतातील रोहित शर्मा (Rohit Sharma) विरुद्ध विराट कोहली (Virat Kohli) दिग्गज क्रिकेटपटू आज दोघे आमनेसामने असणार आहेत. आजचा सामना पाहण्यासाठी विराट कोहलीचे चाहते आणि रोहित शर्माचे चाहते उत्सुक आहेत. त्यामुळे आजच्या सामन्याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. आजचा हा सामना मुंबईमधील वानखेडे स्टेडिअमवर आज संध्याकाळी ७.३० वाजता हा सामना रंगणार आहे.

मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यामधील आजचा सामना कोणता संघ जिंकेल हे सांगणे फार कठीण आहे. मागील सहा सामन्यांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सवर आपले वर्चस्व गाजवले आहे. हे पाहता आजचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू जिंकण्याची शक्यता आहे. यंदाच्या सीझनमध्ये हे दोन्ही संघ पाचव्या सामन्यात आमनेसामने आले आहेत. वानखेडे स्टेडिअमवर झालेल्या आठ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये नऊ वेळा १८० हून अधिक धावसंख्या पाहायला मिळाली आहे. यामध्ये या स्टेडिअमवर चार वेळा २०० धावांचा टप्पा ओलांडला आहे. येथे बाऊंड्री लाईन जवळ असल्याने फलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळतं.

मुंबई इंडियन्सची संघांची प्लेईंग ११ –
रोहित शर्मा (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, कॅमेरॉन ग्रीन, पीयूष चावला, अर्शद खान, नेहाल वढेरा, इशान किशन (विकेटकीपर), जोफ्रा आर्चर, आकाश मांडवाल

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघांची प्लेईंग ११ –
विराट कोहली, एफ डू प्लेसिस (कर्णधार), केदार जाधव, महिपाल लोमरोर, ग्ले मॅक्सवेल, वानिंदू हसरंगा, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अनुज रावत, मोहम्मद सिराज, कर्ण शर्मा, जोश हेजलवुड

हे ही वाचा : 

अजित पवार यांच्या विषयावर संजय शिरसाट यांनी शिंदे गटाची भूमिका मांडली

मुंबईत उघडलेल्या पहिल्या अॅपलच्या स्टोअरचे नाव Apple BKC

मुंबईच्या धर्तीवर ठाण्यातही उभारणार रोहिदास भवन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss