Tuesday, April 30, 2024

Latest Posts

SSC 10th Result 2023, यंदा इयत्ता दहावीचा राज्याचा निकाल लागला 93.83 टक्के

गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल काही लागणार याची उत्सुकता विद्यार्थ्यासोबत त्यांच्या पालकांना देखील लागली होती.

गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल काही लागणार याची उत्सुकता विद्यार्थ्यासोबत त्यांच्या पालकांना देखील लागली होती.अखेर आज दिनांक २ जुन रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीचा विद्यार्थ्यांचा निकाल हा ऑनलाईन पद्धतीने लागणार आहे. तसेच या संदर्भात आज सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद ही पार पडली आहे.

राज्य मंडळाने इयत्ता दहावीची परीक्षा २ मार्च २०२३ ते २५ मार्च २०२३ या कालावधीत पार पडली. राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, काेल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व काेकण या ९ विभागीय मंडळातील २०,०१० शाळांमधील १५,७७,२५६ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नाेंदणी केली हाेती. त्यामध्ये ८,४४,११६ मुले आणि ७,३३,०६७ मुलींचा समावेश हाेता. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांने घेतलेल्या इयत्ता दहावीच निकाल जाहीर झाला आहे. राज्यातील इयत्ता दहावीचा निकाल ९३ .८३ टक्के लागला आहे. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. इयत्ता दहावीला राज्यात विद्यार्थीनींचा निकाल ९५.८७% लागला आहे. तर मुलांचा निकाल ९२.५% लागला आहे.

विभाग निहाय निकाल

पुणे 95.64%
मुंबई 93.66%
औरंगाबाद 93.23%
नाशिक 92.22%
कोल्हापूर 96.73%
अमरावती 93.22%
लातूर 92.66%
नागपूर 92.05%
कोकण 98. 11%

या अधिकृत संकेतस्थळांचे पाहता येईल निकाल

http://www.mahresult.nic.in

http://sscresult.mkcl.org

https://ssc.mahresults.org.in

Latest Posts

Don't Miss