Saturday, April 27, 2024

Latest Posts

‘चोली के पीछे क्या है’ करीनाच्या गाण्याला प्रेक्षकांची नापसंती

'क्रू' (Crew) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘क्रू’ (Crew) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात करिना कपूर खान (Kareena Kapoor Khan), तब्बू (Tabbu) आणि क्रिती सॅनॉन (Kriti Sanon) मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात ९० च्या दशकात माधुरी दीक्षितचे ( Madhuri dixit ) गाजलेलं गाणं ‘चोली के पिछे क्या हैं’ ( Choli Ke Peeche song) याचा रिमेक या चित्रपटात आहे. या गाण्यावरती ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला आहे. मात्र या गाण्याला प्रेक्षकांनी नापंसती दर्शवली आहे.

९० च्या दशकात माधुरी दीक्षितचा खलनायक हा चित्रपट आला होता . त्याचित्रपटात ‘चोली के पिछे क्या हैं’ ( Choli Ke Peeche song) या गाण्यावरती माधुरीचा डान्स आणि तिचे एक्स्प्रेशन चांगलेच प्रेक्षकांना आवडले होते. या गाण्याने लोकांच्या मनावर राज्य केला होत. पण आता करीना कपूर, क्रिती सॅनॉन, तब्बू यांचा ‘क्रू’ (Crew) या चित्रपटात गाण्याचा रिमके बनवण्यात आला आहे. पण आता या गाण्यावरती प्रेक्षकांची प्रतिक्रिया पाहायला मिळाली आहे . हे गाणं प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. हे गाणं चित्रपटात घेणं गरजेचं नव्हतं. या गाण्यात करीनाची तुलना माधुरी सोबत केली जात आहे. तसेच एकाने तर पुन्हा एका गाण्याची वाट लावली असे म्हंटलं आहे .या गाण्यामध्ये करीनाच्या एक्स्प्रेशन वरून देखील बोलले जात आहे .करीना या पेक्षाही चांगला काम करू शकली असती असा देखील म्हंटले जात आहे. माधुरीच्या एक्स्प्रेशन सोबत तिची तुलना केली जात आहे.

‘क्रू’ या चित्रपटाची शूटिंग संपली असून तो चित्रपट भारतात वेगवेगळ्या ठिकाणी झाला आहे. ‘क्रू’ या चित्रपटाचे दिगदर्शन राजेश कृष्णन (Rajesh Krishnan) यांनी केला आहे. बालाजी टेलीफिल्म्स आणि अनिल कपूर फिल्म अॅन्ड कम्युनिकेशन नेटवर्कच्या बॅनरच्या अंतर्गत निर्मित होणार आहे.२९ मार्च २०२४ रोजी हा सिनेमा रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे .

हे ही वाचा:

बीडमध्ये मराठा ओबीसी लढत होण्याची शक्यता,पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या…

मुंगी कितीही लहान असली तरी हत्तीचा चव घेऊ शकते;पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी वसंत मोरे इच्छुक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss