Sunday, April 28, 2024

Latest Posts

‘द क्रू’ चित्रपटात करीना,तब्बु,क्रिती,एअर होस्टेसच्या भूमिकेत

बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर खान क्रिती सेनॉन आणि तब्बू या तिघी सध्या त्यांच्या आगामी 'द क्रू'  या चित्रपटासाठी चर्चेत आहेत.

बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर खान क्रिती सेनॉन आणि तब्बू या तिघी सध्या त्यांच्या आगामी ‘द क्रू’  या चित्रपटासाठी चर्चेत आहेत.या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी आता या तिघी सज्ज झाल्या आहेत. ‘द क्रू’   हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.या चित्रपटातील करीना कपूर खान क्रिती सेनॉन आणि तब्बू या तिघींचा लूक आउट झाला आहे.या चित्रपटचा फर्स्ट लूक पाहिल्यानंतर या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटातील करीना, क्रिती आणि तब्बू यांचा लूक नुकताच रिलीज करण्यात आला आहे. यामध्ये तिघीही एअर होस्टेसच्या लूकमध्ये दिसत आहेत.

‘द क्रू’ या चित्रपटातील तीन अभिनेत्रींचा लूक रिलीज करण्यात आला आहे. यामध्ये करीना, तब्बू आणि क्रिती या रेड कलरच्या आऊटमध्ये दिसत आहेत. करीनानं तिच्या आणि तब्बू आणि क्रितीच्या लूकचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. करीनानं या फोटोला कॅप्शन दिलं, “चेक-इनसाठी तयार आहात? क्रूसोबत उड्डाण करण्याची वेळ झाली आहे.”

‘द क्रू’ या चित्रपटाचे दिग्दर्शन राजेश ए कृष्णन यांनी केले आहे. दरम्यान ‘द क्रू’ हा चित्रपट 29 मार्चला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट अनिल कपूरची मुलगी रिया कपूर आणि लोकप्रिय चित्रपट निर्माती एकता कपूर यानी या चित्रपटाची निर्मीती केली आहे.काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा एक टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटाचा टीझर शेअर करताना करीनानं कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘तुमचा सीटबेल्ट बांधा, तुमचा पॉपकॉर्न तयार ठेवा.’

‘द क्रू’ या चित्रपटात तुम्हाला तीन एअर होस्टेसच्या आयुष्याची  गोष्ट दाखवण्यात येणार आहे.ज्या स्वत:च्या आयुष्यासाठी त्रासलेल्या असतात.या चित्रपटात कॉमेडीचा तडका पाहायला मिळणार आहे.ज्यामध्ये करीना, तब्बू आणि क्रिती यांच्या कॉमेडीची जुगलबंदी पाहायला मिळेल. दरम्याम या तीन अभिनेत्री आपल्या कॉमेडीने प्रेक्षकांची मनं जिंकतील. या चित्रपटात दिलजीत दोसांझही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.दरम्यान आता प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

हे ही वाचा:

गौरी खानचं नव्या क्षेत्रात पदार्पण,सुरु केलं मुंबईत स्वतःचं पहिलं रेस्टॉरंट

मृत्यूच्या खोट्या बातमीनंतर पूनम पांडे पहिल्यांदाच दिसली बाहेर,घेतले देवाचे दर्शन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss