Tuesday, April 30, 2024

Latest Posts

Lara Dutta Birthday Special: विश्वसुंदरी ते एका मुलीची आई, असा आहे लाराचा प्रवास

माजी विश्वसुंदरी अभिनेत्री लारा दत्ताचा आज वाढदिवस आहे. चला तर जाणून घेऊयात तिच्याबद्दल काही खास गोष्टी. लारा दत्ता (Lara Dutta) ही मॉडेलिंग आणि अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असते. भारतातच नव्हे तर परदेशातही तिच्या सौंदर्याचे चाहते आहेत. लाराचा जन्म १६ एप्रिल १९७८ रोजी उत्तर प्रदेशातील गाजियाबाद येथे झाला. २००० लाराला मिस युनिव्हर्स हा मानाचा किताब मिळाला. या यशानंतर लाराने बॉलीवूडमध्ये प्रवेश केला. लाराला तिच्या पहिल्या चित्रपटात अक्षय कुमार (Akshay Kumar) सोबत काम करायची संधी मिळाली. ‘अंदाज’ या चित्रपटात २००३ साली काम केले.

‘अंदाज’ चित्रपटातील ‘रब्बा इश्क ना हो’ या गाण्याच्या शुटिंगदरम्यान एक घटना घडली. या गाण्याचं शुटिंग दक्षिण आफ्रिकेत समुद्रकिनारी चालू होती. लागला पाण्याची खूप भीती वाटत होती. तरी सुद्धा निर्मात्यांनी त्याच ठिकाणी शुटींग करायच ठरवलं. शुटींग चालू असताना एक लाट आली आणि ती लाटांसोबत समुद्रात वाहू लागली. सर्वजण घाबरले. लगेचच अक्षय कुमारने समुद्रात उडी मारली आणि तिचे प्राण वाचवले, आणि या चित्रपटातून तिला सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्री म्हणून पुरस्कार मिळाला. लाराने विश्वसुंदरीचा ‘किताब मिळवत भारताचे नाव मोठे केले होते. त्यानंतर तिने बॉलीवूडच्या अनेक चित्रपटात काम करायला सुरुवात केली. ‘मस्ती’,’नो एंट्री’, हाउसफुल्ल’,’चलो दिल्ली यासारख्या सुपरहिट चित्रपटात काम केले. चित्रपटांबरोबर लारा मॉडेलिंगच पण काम करत होती.

मॉडेलिंग अभिनय बरोबर तिच्या अफेअरच्या चर्चा सुरु होत्या. दिनो मोरिया, डोर्जी अश्या अनेक लोकांसोबत नाव चर्चेत होते. भारतीय टेनिसपटू महेश भूपती आणि लारा दत्ताला भेटू लागले. पण महेश आधीच विवाहित होता. महेशचा स्वभाव लाराला आवडायला लागला. हळूहळू दोघे एकमेकांचा प्रेमात पडले. महेशने सात वर्षांनी त्याच्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला. २०११ मध्ये महेश आणि लाराने लग्न केलं. या दोघांना एक मुलगी आहे. लाराने लग्नानंतर चित्रपटात कमी काम केले. गरोदरपणात लारा योगाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मिडियावर टाकत होती. आताही व्यायामाचे फोटो लारा अपलोड करत असते. ‘हंड्रेड’ ही वेब सिरीज काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाली होती. यामध्ये तिने पोलीसाची भूमिका साकारली होती, आणि या वेबसिरीजला चाहत्याने भरभरून प्रोत्साहन दिले होते.

हे ही वाचा:

‘फकिरा’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला, NANA PATEKAR सह झळकणार SAYAJI SHINDE

‘अलबत्या गलबत्या’ आता थ्रीडीमध्ये रुपेरी पडद्यावर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss