Thursday, May 2, 2024

Latest Posts

Roadies १९ मधून का केलं रिया चक्रवर्तीला बॉयकोट

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम रोडीजचे नवे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोनू सूद (Sonu Sood) हा कार्यक्रम होस्ट करणार आहेत.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम रोडीजचे नवे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोनू सूद (Sonu Sood) हा कार्यक्रम होस्ट करणार आहेत. या कार्यक्रमामध्ये गॅंग लिडरच्या (Gang leader) भूमिकेत प्रिन्स नरुला (Prince Narula), गौतम गुलाटी (Gautam Gulati) आणि रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) हे तीन कलाकार असणार आहेत. परंतु गॅंग लीडर प्रिन्स नरुला आणि गौतम गुलाटीने रिया चक्रवर्तीसोबत शूटिंग करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे ‘रोडीज १९’ मधून रिया चक्रवर्तीचा पत्ता कट करण्यात आला आहे असे सांगण्यात येत आहे.

रोडीजच्या नव्या पर्वाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. चाहत्यांमध्ये या प्रचंड कार्यक्रमाची खूप उत्सुकता लागली आहे. परंतु असे सांगण्यात येत आहे की या कार्यक्रमामधून रिया चक्रवर्तीचा पत्ता कट करण्यात आला आहे आणि त्यामुळे चाहते नाराज झाले आहेत. आता प्रेक्षक रोडीज १९ च्या निर्मात्यांना ट्रोल करत आहेत. मीडियाच्या रिपोर्टनुसार, प्रिन्स नरुला आणि गौतम गुलाटीने रिया चक्रवर्तीसोबत शूटिंग करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. प्रिन्स आणि गौतम हे जेव्हा रिया सोबत काम करणार आहेत हे त्यांच्या चाहत्यांना समजले तेव्हा त्यांचे चाहते नाराज झाले होते.

प्रिन्स आणि गौतमाच्या चाहत्यांची अशी इच्छा नव्हती की आपल्या लाडक्या सेलिब्रिटींना रियासोबत शूटिंग करावे. रोडीज सिझन १९ हा कार्यक्रम येत्या ३ जूनपासून प्रदर्शित होणार आहे. ३ जूनपासून प्रत्येक शनिवारी आणि रविवारी संध्याकाळी सात वाजता हा कार्यक्रम प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आता रिया आलेल्या अडचणींवर मात करणार की या कार्यक्रमातून तिचा पत्ता कट होणार या कडे सर्व प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा : 

घरातील जुने, मळकटलेले सोफे स्वच्छ करायचेत? मग वापरा ‘या’ सोप्या टिप्स

अजित पवारांकडून निर्णयाचे स्वागत, तर पुढील ८ दिवस करणार राज्यभर दौरा

Raj Thackeray यांनी काढले अजित पवारांचे व्यंगचित्र, म्हणाले…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss