Thursday, May 9, 2024

Latest Posts

गणपतीच्या आठवड्यात येणाऱ्या उपवासाचे महत्व तुम्हाला माहित आहे का?, जाणून घ्या सविस्तर माहिती

राज्यभरात सगळीकडे बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी चालू आहे. आगमनासाठी फक्त अवघे काही तास बाकी आहेत.

Ganeshostav 2023 – राज्यभरात सगळीकडे बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी चालू आहे. आगमनासाठी फक्त अवघे काही तास बाकी आहेत. मोठ्या आनंदात उत्साहात गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. १९ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर या कालावधीत गणपती बाप्पा घरोघरी विराजमान होणार आहेत. गणपती आगमनाच्या आधीपासूनच वेगवेगळे उपवास चालू होतात. या आठवड्याभराच्या कालावधीत अनेक उपवास केले जातात. हरतालिका पूजा, गणेश चतुर्थी,ऋषी पंचमी, गौरी अहवाहन हे विविध सण साजरा केले जातात. सप्टेंबर महिन्याचा आठवडा सण आणि उपवासासाठी खूप महत्वाचा मानला जातो. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी हरतालिका पूजा केली जाते. त्यानंतर मग बाकीचे उपवास केले जातात. चला तर जाऊन घेऊया १९ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर पर्यंत असणाऱ्या उपवासाचे महत्व

हरतालिका पूजा:-
गणपती आगमनाच्या आधल्या दिवशी हरतालिकेचा उपवास केला जातो. या दिवशी मुली, विवाहित स्त्रिया उपवास करतात. भाद्रपदात येणाऱ्या सणाला हरतालिका तृतीय असे म्हणतात. हरतालिकेच्या दिवशी निर्जळी उपवास केला जातो. संपूर्ण दिवसभर उपवास केल्यानंतर दुसऱ्या दिवशी गणपती आगमन आणि पूजा झाल्यानंतर हा उपवास सोडला जातो. हे व्रत केल्याने भगवान शंकर आणि पार्वतीची कृपा राहून संकटे दूर होतात.

गणेश चतुर्थी:-
गणेश चतुर्थी ही १९ सप्टेंबरला आहे. या दिवशी गणपती बाप्पाचे घरी आगमन केले जाते. त्यानंतर विधिवत पूजा करून नैवेद्य दाखवला जातो. बाप्पाची १० दिवस पूजा केल्यानंतर अनंत चतुर्थीला विसर्जन केले जाते. या दिवसात घरोघरी आनंद आणि उत्साहाचे वातावरण असते.

ऋषी पंचमी:-
दरवर्षी पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला ऋषी साजरी केली जाते.यावर्षी ऋषी पंचमी २० सप्टेंबर रोजी आहे. ऋषी पंचमीचा उपवास विवाहित स्त्रिया किंवा मुली देखील करू शकतात. या दिवशी सप्तऋषींची पूजा करून जाणूनबुजून किंवा नकळत झालेल्या पापांचे प्रायश्चित्त करण्यासाठी हे व्रत केले जाते.या दिवशी जेवणात भाकरी, दही, मिक्स भाज्या, गोडाचे पदार्थ बनवले जातात.

गौरी पूजा:-
लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन झाल्यानंतर दोन दिवसाने गौरी घरी आणल्या जातात. यावर्षी गौरी आवाहन सकाळी०६. १२ वाजेपासून ते दुपारी ०३. ३४ पर्यंत आहे. गौरी घरी आणल्यानंतर त्यांना छान तयार केले जाते. साडी, सोन्याचे दागिने घातले जातात. त्यानंतर त्यांची पूजा केली जाते. दुसऱ्या दिवशी नक्षत्रांवर गौरीची पूजा केली जाते. यादिवशी पानाफुलांची आरास देखील केली जाते. शेवंतीची वेणी माळवतात. हार, चाफ्याचे फूल, केवड्याचे पान वाहिली जातात. गौरीची स्थापना झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करून महानैवेद्य दाखवला जातो.

गौरी विसर्जन:-
तिसऱ्या दिवशी पुन्हा नक्षत्रावर गौरीची पूजा केली जाते. या दिवशी कापसाची गाठ बांधतात. सूतमध्ये हळद, कोरडे फळे, तमालपत्र, फुलं, झेंडूची पाने, काजूची फुलं, रेशीम धागा मिसळतात.गौरी पूजन करुन आरती केली जाते. त्यानंतर परंपरेनुसार मुखवठे हलवण्यात येतात. नंतर नदीत विसर्जन करून नदीतील माती घरी आणली जाते आणि संपूर्ण घरावर टाकली जाते.

हे ही वाचा: 

गौरीच्या नैवेद्याला करा हे खीरीचे दोन प्रकार

मुंबईतील मानाच्या गणपतीचे मुखदर्शन सोहळा पडला पार; मुंबईचा राजा, गिरगावचा राजा….

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss