Saturday, April 27, 2024

Latest Posts

कोकणातील पारंपरिक पदार्थ शिरवाळे आणि नारळाचा रस

शिरवाळे हा पदार्थ कोकणात शिमगा (होळी) या सणाला केला जातो.

शिरवाळे हा पदार्थ कोकणात शिमगा (होळी) या सणाला केला जातो. हे शिरवाळे तांदळाच्या पिठापासून तयार केले जातात. हा पदार्थ आपण नेहमीच्या नाष्टाला किंवा गोड पदार्थ म्हणून देखील खाऊ शकतो. शिरवाळे लहानमुलांपासून ते मोठ्यामाणसांपर्यंत सगळेच आवडीने खातात.शिरवाळे हे फक्त नारळाचं रसासोबत खालले जातात. या पदार्थसाठी लागणारे साहित्य आपल्या रोजच्या वापरातले आहेत. त्यामुळे आपण हे लगेच घरी बनवू शकतो. चला तर पाहुयात कोकणातील पारंपरिक पद्धतीने शिरवाळे आणि नारळाचा रस..

साहित्य :-
१. तांदळाचे पीठ
२. नारळ
३. वेलची पुड
४. मीठ
५. गुळ

कृती :-

सर्वप्रथम तांदळाचे पिठा एका ताटामध्ये घ्या. त्या तांदळाच्या पिठामध्ये चवीपुरतं मीठ आणि गरम पाणी टाका. ते पीठ मळून घ्या. मग त्याचे मध्यम आकारचे गोळे करून घ्या. गॅस वरती एका टोपामध्ये गरम पाणी करायला ठेवा. गरम पाणी करून झाल्यानंतर त्या गोळ्यांना त्यामध्ये उकडण्यासाठी ठेवा. मग ते गोळे त्यामधून बाहेर काढा. मग चकलीच्या साच्याने बारीक शेवया पाढून घ्या. तयार आहेत शिरवाळे. नारळाचं रस बनवणायसाठी नारळ फोडून बारीक करून मिक्सरमध्ये नारळाचा रस काढून घ्या. त्या रसामध्ये थोडी वेलची पुड टाका.आपल्याला आवडीप्रमाणे गुळ टाका. गुळ विरगळेपर्यंत चमच्याच्या साह्याने फिरवत राहा.नारळाच्या रसामध्ये कमी गुळाचा वापर करावा. कारण खोबर गोड असत. तयार आहेत गोड शिरवाळे आणि नारळाचा रस .शिरवाळे हे एका प्लेट मध्ये घेऊन त्यावर नारळाचा रस टाकून खाल्ले जातात.

हे ही वाचा:

महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये पुन्हा एकदा चर्चा होण्याची शक्यता

खैरे दानवे वाद अखेर मिटला, वाद संपल्यानंतर अंबादास दानवेंनी केली मोठी घोषणा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss