Monday, April 29, 2024

Latest Posts

डाळिंब खाण्याचे फायदे माहिती आहेत का?

आपल्या आरोग्यासाठी फळे खूप महत्वाचे असतात. डाळिंब खाल्याने आपल्याला चांगल्या प्रकारचे फायदे होतात. जे  फळे खातात ते लवकर आजारी पडत नाही असे म्हटले जाते. डाळिंब असे एक फळ आहे जे आपण खाल्याने आजारपणापासून दूर राहू शकतो. अशक्तपणा (Weakness) दूर करण्यासाठी डाळिंबाचा सेवन करावे. याशिवाय आपण डाळिंबाचे अजुन बरेच फायदे पाहणार आहोत. अनेक फळांमध्ये महत्वाचे गुणधर्म असतात. डाळिंब खूप चविष्ट असते. डाळिंबामध्ये व्हिटॅमिन सी आणि बी (Vitamin B and Vitamin C) असते. यामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस, सेलेनियम आणि झिंक डाळिंबामध्ये असते. डाळिंब खाण्याचे फायदे आहेत तसेच तोटे देखील आहेत.

डाळिंबामध्ये अँटिऑक्सिडंट हा गुणधर्म असतो. इतर फळांपेक्षा जास्त अँटिऑक्सिडंट असते. यामुळे पेशींचे नुकसान होत नाही. कर्करोगापासून बचाव करण्यासाठी डाळिंब महत्वाचे असते. त्यामुळे आपण कर्करोगाचा धोका टाळू शकतो. ज्या लोकांना अल्झायमर हा रोग असेल तर डाळिंब खाल्याने दूर होतो, आणि व्यक्तीची समरणशक्ती चांगली राहते. पचनासाठी डाळिंबाचा रस आतड्याची जळजळ दूर करतो. जर कोणाला डायरियाचा त्रास असेल तर त्याने डाळिंबाचे  सेवन करू नये. सांधेदुखी, वेदना इत्यादी त्रास होत असेल त्याने डाळिंब खावे. डाळिंब हे हृदयविकारावर फायदेशीर  आहे. रक्तदाबाच्या (BP Blood Pressure) व्यक्तीने डाळिंबाचा रस पिणे खूप चांगले असते. मधुमेहाचा त्रास असेल तर त्याने उपचारादरम्यान डाळिंबाचा रस पिल्यास मधुमेह होऊ शकत नाही. डाळिंब इन्सुलिन आणि रक्तातली साखर कमी करण्यास मदत करते. कमी रक्तदाब (Low BP) असल्यास डाळिंब कमी प्रमाणात खावे. जर तुम्ही त्वचेसाठी डाळिंबाचा रस किंवा डाळिंबाची साल वापरत असाल तर ते चुकीचं आहे. डाळिंबाची साल किंवा रस वापरल्यास त्वचेला त्रास , खाज, पुरळ, श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. तर अशाप्रकारे डाळिंबाचे अनेक फायदे आहेत.

हे ही वाचा:

मुंगी कितीही लहान असली तरी हत्तीचा चव घेऊ शकते;पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी वसंत मोरे इच्छुक

सरकारमध्ये अनेक भ्रष्टाचारी लोक आहेत; मनोज जरांगेंचा सरकारवर आरोप

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss