Thursday, June 1, 2023

Latest Posts

‘हे’ पदार्थ नेमके किती दिवस Fridge मध्ये ठेऊ शकतो?

सध्याच्या धावपळीच्या जीवनात अनेकदा ताजे अन्न बनवायला जमत नाही. त्यामुळे अनेक जण मोठ्याप्रमाणात फ्रिज चा वापर सर्रास करतात.

सध्याच्या धावपळीच्या जीवनात अनेकदा ताजे अन्न बनवायला जमत नाही. त्यामुळे अनेक जण मोठ्याप्रमाणात फ्रिज चा वापर सर्रास करतात. फ्रिजमध्ये ठेवलेले अन्न हे जास्त काळ टिकून राहते. रात्रीचे उरलेले जेवण किंवा एखादा पदार्थ आपण सहजपणे घालून फ्रिजमध्ये ठेवून देतो. कारण तो पदार्थ फेकायला आपल्याला आवडत नाही. परंतु फ्रिजमध्ये ठेवलेले अन्न हे कितीकाळ टिकून राहू शकते? हे अनेकांना माहीत नसते.जास्त काळ फ्रिजमध्ये ठेवलेले जेवण खाल्यान्ने फूड पॉईझनिंगचा (Food Poisoning) धोका निर्माण होऊ शकतो. तसेच बॅक्टेरिया (Bacteria) मुळे खाण्याचा गंध, रंग आणि स्वादही बदलत नाही. पण अनेकांना हे सुरक्षित आहे की नाही याबाबत कल्पनाच नसते.

धावपळीच्या जीवनशैलीमुळे वेळेवर जेवण तर सोडाच पण गरम आणि ताजे अन्न खाण्यासाठीही वेळ मिळत नाही. बरेच जण रात्री जेवण बनवून फ्रिज मध्ये ठेवतात व सकाळी तोच डब्बा ऑफिसला घेउन जातात. परंतु शास्त्रन्यांच्या मते फ्रिज मधले अन्न खाणे हे आपल्या शारीरासाठी हानिकारक असते.चला तर मग जाणून घेऊया कच्चं चिकन, पनीर व उकडलेले अंडी हे पदार्थ नेमके कितीकाळ फ्रिजमध्ये टिकून राहू शकतात.

अंडी-

फूड सेफ्टी (Food safety) अँड सॅनिटेशन एक्सपर्ट (Sanitation Expert) , युनिव्हर्सिटी ऑफ सेंट्रल फ्लोरिडा च्या रोसेन कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटचे प्रोफेसर केविन मर्फी यांच्या मते अंड्यांवर लिहिलेली एक्सपायरी डेट अंडी किती ताजी आहेत हे सांगतात. एक्सपायरी डेट नंतर अंड्यांचा वापर ३ ते ५ आठवड्यांसाठी करू शकतो.उकडलेले अंडे लवकर खराब होतात, पण फ्रिज मध्ये ठेवल्याने ते आठवडाभर वापरता येतात.

पनीर-

पनीर ३ ते ४ आठवडे चांगले राहते. फ्रिज मध्ये दीर्घकाळ पनीर टिकवण्यासाठी, पनीर एका पाण्याच्या बाउल मध्ये ठेवावे. महिनाभर पनीर टिकवण्यासाठीए ते डीप फ्रिजर मध्ये स्टोअर करून ठेवावे. डीप फ्रिजर मध्ये ठेवलेले पनीर वापरताना ते गरम पाण्यात उकळून घेतल्याने कडक झालेले पनीर अगदी मऊ होते.

चिकन-

कच्च मांस, चिकन या सारखे पदार्थ काहीच दिवस फ्रिज मध्ये टिकून राहू शकतात. हे पदार्थ जास्त दिवस फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यात किटाणू होऊ शकतात, ज्यामुळे विषबाधा होऊ शकते. म्हणूनच हे पदार्थ जास्त दिवस फ्रिजमध्ये ठेऊ नये.

हे ही वाचा : 

राहुल गांधी यांनी केली ट्रकमधून सवारी: अंबाला ते चंदिगढ

आज संध्याकाळी अरविंद केजरीवाल होणार मुंबईत दाखल, या नेत्यांची घेणार भेट

२६ मे रोजी छ. संभाजीनगर जिल्ह्यात एकनाथ शिंदे घेणार जाहीर सभा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss