Thursday, May 2, 2024

Latest Posts

पगार हातात टिकत नाही? पैशांची बचत करण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

बहुतांश लोकांचा महिन्याचा पगार हा महिना संपायच्या आधी संपतो. अगदी काही वेळा खरेदी करण्यासाठीसुद्धा त्यांच्याकडे पैसे शिल्लक राहत नाही. महिन्याला चांगला पगार मिळत असूनही पैशांची बचत होत नाही. मात्र त्याला कारणे ही बरेच आहेत.

बहुतांश लोकांचा महिन्याचा पगार हा महिना संपायच्या आधी संपतो. अगदी काही वेळा खरेदी करण्यासाठीसुद्धा त्यांच्याकडे पैसे शिल्लक राहत नाही. महिन्याला चांगला पगार मिळत असूनही पैशांची बचत होत नाही. मात्र त्याला कारणे ही बरेच आहेत. काही लोकांचा पगार मुळातच कमी असतो, काही लोकं पगार झाल्या झाल्या पैसे खर्च करतात, काही लोकांचे कुटुंब मोठे असते, काही लोक घरी एकटेच कमवणारे असतात, काही जणांचे पैसे इएमआय अथवा हफ्ते भारण्यातच निघून जातात. चांगला पगार असूनही काहीजण पैशांची व्यवस्थित बचत करू शकत नाहीत. बरेच लोक अनेक मोठ्या प्रेमात अनावश्यक खर्च करतात. काहींना तर आवश्यक खर्च आणि अनावश्यक खर्च यातील फरक सुद्धा समजत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला तुमच्या पैशांची बचत कशी करावी याबद्दल काही टिप्स देणार आहोत.

खर्चाचे पद्धतशीरपणे आराखडा तयार करा

तुमचा महिन्याचा पगार हा जास्त असुदे अथवा कमी असुदे पण तुम्ही तुमच्या खर्चाचा योग्य पद्धतीने आराखडा तयार केलात तर तुमची नक्कीच पैशाची बचत होईल. महिन्याच्या वेतनाचे तुम्ही योग्य पद्धतीने बचत करा. अनावश्यक खर्च टाळा. गरजेच्या वस्तू खरेदी कार्यावर भर द्या. तुम्ही केलेल्या खर्चांची नोंद ठेवा.

अनावश्यक खर्च करणे टाळा

काहीजणांना सवय असते ती म्हणजे पगार हातात मिळाल्या सोबतच लगेच खर्च करून टाकतात. ज्या गोष्टींची आवश्यकता नसते त्या गोष्टी घेण्यास प्राधान्य देतात. तुम्ही सर्वप्रथम तुम्हाला लागणाऱ्या गरजेच्या वस्तू ओळखून आधी त्या वस्तू घेण्यास प्राधान्य दिले पाहिजे.

३० % बचत करा

तुमचा महिन्याचा पगार आला की जास्तीत जास्त ३०% पगारातील रक्कम बँकेत अथवा इतर काही ठिकाणी बचतीसाठी काढून ठेवा. तुम्ही बँकेत अथवा म्युचअल फंड (Mutual Fund) एफडी (FD) यांमध्ये तुमचे पैसे गुंतवू शकता. असे केल्याने तुम्हाला आर्थिक पाठबळ मिळते. कधी तुम्हाला इमर्जन्सी (Emergency) मध्ये पैशांची गरज भासली तर तुम्हाला गुंतवणूक केलेले पैसे कामी येतील.

अतिरिक्त खरेदी टाळा

आजकाल शॉपिंगचे (Shopping) लोकांना व्यसनच लागले आहे. त्यासाठी करणेही अनेक आहेत. त्यात ऑनलाईन शॉपिंगची भर पडल्याने लोकांना घरबसल्या खरेदी करण्याचे वेड लागले आहे. या खरेदीच्या नादात पगार हातात टाकतच नाही. त्यामुळे वेळीस तुम्ही अनावश्यक खरेदी करण्यास टाळा.

हे ही वाचा : 

जेवणापूर्वी गोड पदार्थ खाण्याचे हे आहेत फायदे; जाणून घ्या एका क्लिकवर

हॉटेल स्टाईल Crispy Chili Chicken बनवा घरच्या घरी…

Degree courses च्या प्रवेश प्रक्रियेला आजपासून सुरुवात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss