Monday, April 29, 2024

Latest Posts

ही निवडणूक देशाला महासत्तेकडे घेऊन जाणारी आहे – CM EKNATH SHINDE

कोल्हापूर व हातकणंगले लोकसभेतील महायुती उमेदवारांची उमेदवारी अर्ज दाखल रॅली १५ एप्रिल रोजी काढण्यात आली होती. कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांचे निवडणूक अर्ज यावेळी दाखल करण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश आवाडे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी आवाडे कुटूंबियांनी पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. यावेळी शिवसेना नेते रामदास कदम, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, माजी मंत्री विजयबापू शिवतारे, आमदार विनय कोरे आणि समस्त आवाडे कुटूंबीय उपस्थित होते.

कोल्हापूर शक्तिपीठ महायुतीच्या दोन्ही उमेदवारांच्या पाठीशी आहे. ही निवडणूक एका व्यक्तीची नाही, एका मतदारसंघाचीही नाही तर ही निवडणूक देशाला महासत्तेकडे घेऊन जाणारी आहे. ही निवडणूक नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवणारी निवडणूक आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याचे आवाहन याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अर्थव्यवस्था केवळ मजबूत केली नाही तर ११ व्या क्रमांकावरुन ५ व्या क्रमांकावर आणली. आता भारताला तिसऱ्या क्रमांकावर नेण्यासाठी आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करायचे आहेत. अतिवृष्टीमुळे कोल्हापूरात येणाऱ्या महापुराबाबत कायमस्वरुपी तोडगा काढणारा ३५०० कोटींचा कृती आराखडा राज्य सरकारने मंजुर केला असून त्याचे काम सुरु झाले आहे. यामुळे कोल्हापूरकरांची महापुराची चिंता कायमची मिटणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. तसेच पंचगंगेला प्रदूषणमुक्त करण्यासाठी निधी दिल्याचेही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

यावेळी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, शिवसेना नेते रामदास कदम, खासदार धनंजय मंडलिक, खासदार धनंजय महाडिक, आमदार प्रकाश आवाडे, आमदार विनय कोरे तसेच महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

हे ही वाचा:

‘बिग हिट मीडिया’चं ‘Bride तुझी नवरी’ हे रोमँटिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीस

Salman Khan च्या घरावर गोळीबार, CM Eknath Shinde यांनी केली फोनवरून चर्चा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss