Tuesday, April 30, 2024

Latest Posts

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक ‘या’ दिवशी होणार

अंतर्गत यादवीमुळे सातत्याने वादात असलेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक (Akhil Bhartiya Marathi Chitrapat Mahamandal) जाहीर करण्यात आली.

अंतर्गत यादवीमुळे सातत्याने वादात असलेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक (Akhil Bhartiya Marathi Chitrapat Mahamandal) जाहीर करण्यात आली. अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांनी पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. २० नोव्हेंबरला मतदान व २२ तारखेला निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची मुदत संपून आता दीड वर्षे झाली, पण कोरोना आणि महामंडळातील अंतर्गत राजकारणामुळे निवडणूक लावण्यात आली नाही. मुदत संपल्यानंतर कार्यकारिणीकडून मेघराज यांना बाजूला करत बहुमताने सुशांत शेलार यांना अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले होते. त्यामुळे वाद विकोपाला गेला होता. याचा महामंडळाच्या कामावरही परिणाम झाला होता. निवडणूक समितीमध्ये पाच जणांचा समावेश आहे. मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून ॲड. प्रशांत पाटील यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. निवडणूक समितीमध्ये अधिकारी म्हणून प्रताप वसंतसिंह परदेशी पुणे, आकाराम पाटील कोल्हापूर, शहाजीराव पाटील पुणे आणि सुनील मांजरेकर, मुंबई यांचा समावेश आहे.

निवडणूक कार्यक्रम हा पुढील प्रमाणे असेल ,

कच्ची मतदार यादी हि २७ सप्टेंबरला प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर हरकती स्वीकारण्याचा कालावधी २७ ते ३ ऑक्टोबर पर्यंत असणार आहे अंतिम यादी १२ ऑक्टोबर रोजी कोल्हापूर कार्यालयात जाहीर होणार आहे. तर अर्ज वाटप कालावधी १२ ते १५ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. तसेच उमेदवारी अर्ज कोल्हापूरसह मुबंई, पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि नागपूर कार्यालयात उपलब्ध असणार आहेत. अर्ज स्वीकारण्याचा कालावधी १७ ते १९ ऑक्टोबर पर्यंत असणार आहे. आणि २० ऑक्टोबर रोजी अंतिम उमेदवार यादी जाहीर होणार आहे. उमेदवार अर्ज छाननी प्रक्रिया हि २७ ऑक्टोबर रोजी होणार असून २९ ऑक्टोबर पात्र उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. उमेदवारी मागे घेण्याचा कालावधी २९ ते ३१ ऑक्टोबर हा असणार आहे तर चिन्हासह पात्र उमेदवरांची ४ नोव्हेंबर रोजी प्रसिद्द होणार आहे. तर २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर २२ नोव्हेंबर रोजी कोल्हापूर कार्यालयात मतमोजणी होणार आहे.

हे ही वाचा:

कोथरूडमध्ये रंगणार ‘महाराष्ट्र केसरी’; बृजभूषण सिंह लावणार हजेरी?

दसऱ्याच्या मुहूर्तावर रिलीज होणार प्रभास आणि सैफ अली खानच्या आदिपुरुषचा टीझर?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss