Tuesday, May 30, 2023

Latest Posts

मुंबईकरांसाठी खुशखबर! ताडदेव, दादरसह अनेक ठिकाणी म्हाडाच्या घरांच्या सोडती

मुंबईमध्ये गृहस्वप्न साकार करण्यासाठी म्हाडा लॉटरीच्या (MHADA Lottery 2022) प्रतिक्षेत तुम्ही असाल, तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे.

मुंबईमध्ये गृहस्वप्न साकार करण्यासाठी म्हाडा लॉटरीच्या (MHADA Lottery 2022) प्रतिक्षेत तुम्ही असाल, तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. मुंबईसारख्या मोठ्या शहरात स्वतःच घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतंच. एका ठराविक वयात आलो की प्रत्येकाला हे स्वप्न साकार करण्याची इच्छा ही होतच असते. ही उच्च पूर्ण करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती जिवाच्या आकांताने मेहनत करत असतो. अश्या प्रत्येक व्यक्तीसाठी म्हाडाने ऐक मोठा दिलासा दिला आहे. म्हणजेच मुंबईमध्ये घर घेण्याचे सर्वसामान्यांचे स्वप्न साकार करणाऱ्या म्हाडाने मुंबईमध्ये लॉटरी काढली आहे.

म्हाडाच्या (Mhada) मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे विविध उत्पन्न गटातील नागरिकांसाठी ४०८३ घरांची सोडत जाहीर (Mhada Lottery 2023) केली आहे. आज दिनांक २२ मे पासून या सोडतीसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात ही होणार आहे. तसेच हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहे. आज दिनांक २२ मे पासून हे अर्ज म्हाडाच्या संकेतस्थळावर दुपारी ३ वाजल्यापासून उपलब्ध होणार आहेत. तर म्हाडाची ही घरं गोरेगाव पहाडी, विक्रोळीच्या कन्नमवारनगर, अँटॉप हिल, बोरिवली, मालाड, दादर, सायन परळ, ताडदेवमध्ये आहेत. तसेच ही सर्व प्रक्रिया अत्याधुनिक सॉफ्टवेअरच्या साहाय्याने कार्यान्वित होणार असून घरांची सोडत १८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता वांद्रेतील रंगशारदा सभागृहात पार पडणार आहे.

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांच्या सोडतीची मागील एक वर्षापासून चर्चा सुरु होती. परंतु काही कारणांमुळे सोडतीला उशीर झाला. मुंबई मंडळातील घरांसाठी शेवटची सोडत २०१९ मध्ये काढण्यात आली होती. यात केवळ २१७ घरांचा समावेश होता. अखेर मंडळाने आता ४ हजार ८३ घरांच्या सोडतीच्या जाहिरातीची प्रक्रिया पूर्ण केली. त्यानुसार सोमवार २२ मे पासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होणार असल्याचं म्हडाकडून सांगितलं जात आहे.

या सर्व घरांसाठीची माहिती म्हाडाच्या अधिकृत संकेत स्थळावर म्हणजेच https://housing.mhada.gov.in आणि https://www.mhada.gov.in यावर प्रसिध्द करण्यात आली आहे. इच्छुक अर्जदारांनी संकेतस्थळांचा वापर करावा, असे आवाहन मिलिंद बोरीकर यांनी केले आहे. ऑनलाइन दावे व हरकती ७ जुलै दुपारी ३ वाजेपर्यंत दाखल करता येणार आहेत. सोडतीसाठी स्वीकृत अर्जांची अंतिम यादी १२ जुलै रोजी दुपारी ३ वाजता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळांवर प्रसिद्ध केली जाणार आहे.

अर्जदारांनी मार्गदर्शनासाठी ०२२-६९४६८१०० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन मुंबई मंडळातर्फे करण्यात आले आहे.

एकूण सदनिका ४०८३
अत्यल्प उत्पन्न गट- २७९०
अल्प उत्पन्न गट – १०३४
मध्यम उत्पन्न मगट – १३९
उच्च उत्पन्न गट – १२०

हे ही वाचा:

Jayant Patil ईडी कार्यालयाकडे रवाना, कार्यकर्त्यांना केले आवाहन…

Jayant Patil यांची आज ED चौकशी, मुंबई कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक

लवकरच लागणार राज्यातील HSC आणि SSC चा निकाल, सर्वांचे लक्ष निकालाकडे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss