Saturday, April 27, 2024

Latest Posts

Jayant Patil ईडी कार्यालयाकडे रवाना, कार्यकर्त्यांना केले आवाहन…

जयंत पाटील हे ईडी कार्यालयाकडे ईडी कार्यालयाकडे रवाना झाले आहेत. तर त्यांनी एक ट्विट करत आवाहन केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांना आज दिनांक २२ मे २०२३ रोजी मुंबईतील ईडी कार्यालयात सकाळी ठीक ११ वाजता चौकशीसाठी हजर राहणार सांगितले आहे. इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस (आयएल अॅण्ड एफएस) गैरव्यवहार प्रकरणी जयंत पाटील यांना समन्स बजावण्यात आले होते. या सर्व पार्श्वभूमीवर जयंत पाटील हे ईडी कार्यालयात हजर होण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमीका घेतली आहे. जयंत पाटील यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादीच्या मुंबई कार्यालयाबाहेर आक्रमक भूमीका घेतली आहे. संपूर्ण राज्यभरातून कार्यकर्ते हे मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. तसेच जयंत पाटील हे ईडी कार्यालयाकडे ईडी कार्यालयाकडे रवाना झाले आहेत. तर त्यांनी एक ट्विट करत आवाहन केले आहे.

तर जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीविरोधात आज मुंबईतील राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली आहेत. सांगली, पुणे आणि नाशिकमध्येही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ईडीविरोधात रस्त्यावर उतरणार आहेत.संपूर्ण राज्यभरातून कार्यकर्ते हे मुंबईमध्ये दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना देखील आव्हान केले आहे. त्यांनी एक ट्विट केले आहे आणि त्या मध्ये ते म्हणाले आहेत की, आज सकाळी ११ वाजता मी ईडी कार्यालयात उपस्थित राहणार आहे. ईडीचे समन्स आल्यापासून मला राज्यभरातून माझ्या पक्षातील व इतर मित्र पक्षांतील पदाधिकाऱ्यांचे फोन येत असून राज्यभरातून लोक आज ईडी कार्यालयाबाहेर येत असल्याचे मला समजत आहे.

माझी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना विनंती आहे कि कोणीही मुंबईला येऊ नये. मी या चौकशीकामी ईडीला पूर्णपणे सहकार्य करणार असून आपण सर्वांनी माझ्याप्रती दाखवलेल्या प्रेमाबद्दल मी आपला आभारी आहे.

तसेच ईडी चौकशी साठी जात असताना जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी बोलत असताना जयंत पाटील हे म्हणाले आहेत की ईडी ला पूर्णपणे सहकार्य करणार आहे. तसेच कार्यकर्त्यांना आवाहन करतो कि कोणीही मुंबईमध्ये येऊ नये.

हे ही वाचा:

IPL2023, कोणता संघ प्लेऑफचे चौथे स्थान मिळणार?

Aluminium Foil Paper वापरणे टाळा, उद्भवू शकतो आरोग्यावर मोठा परिणाम!

वर्षा निवासस्थानी जाऊन भगतसिंह कोश्यारींनी घेतली एकनाथ शिंदेची भेट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss