Saturday, April 27, 2024

Latest Posts

लवकरच लागणार राज्यातील HSC आणि SSC चा निकाल, सर्वांचे लक्ष निकालाकडे

सध्या संपूर्ण राज्यातील जनतेचं लक्ष जसे राज्यातील राजकारणाकडे लागले आहे तसेच राज्यातील दहावी (SSC) आणि बारावीच्या (HSC) विध्यार्थ्यांच्या निकालाकडे देखील लागले आहे.

सध्या संपूर्ण राज्यातील जनतेचं लक्ष जसे राज्यातील राजकारणाकडे लागले आहे तसेच राज्यातील दहावी (SSC) आणि बारावीच्या (HSC) विध्यार्थ्यांच्या निकालाकडे देखील लागले आहे. नुकताच सीबीएससी (CBSC) आणि आयसीएससी (ICSC) बोर्डाचा बारावीचा निकाल नुकताच लागला. तसेच इतर राज्यातील देखील मोठ्या राज्याचे निकाल देखील लागले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या निकालाकडे आता सर्वांचे लक्ष हे लागले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परिक्षेचा निकाल कधी लागणार याकडे सर्व विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं आहे. आतापर्यंत बारावी बोर्डाचा निकाल हा मे महिन्याचा शेवटचा आठवडा किंवा जूनचा पहिला आठवड्यात लागलेला जातो तर दहावी बोर्ड (SSC Board) परीक्षेचा निकाल जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होतो. परंतु यंदाच्या वर्षी अजून कोणतीही तारीख हि महाराष्ट्र बोर्डाकडून जाहीर करण्यात आलेली नाही.

तसेच गेल्या अनेक दिवसांपासून बारावीच्या निकालासंदर्भात अनेक तारखा या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. पण या अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहान बोर्डाकडून केलं गेलं. तसेच निकाल जाहीर होण्याच्या एक दिवस आधीच या संदर्भात सविस्तर माहिती ही दिली जाते. तसेच हा निकाल विद्यार्थी कुठे पाहू शकता? कोणते संकेत स्थळ आहे काय वेळ आहे या संदर्भात सविस्तर माहिती ही अधिकृतपणे दिली जाते.

 

तर यंदाच्या वर्षी बारावीच्या बारावीच्या सर्वच शाखांची परीक्षा ही १८ फेब्रुवारी ते १८ मार्च यादरम्यान पार पडली. राज्यभरातून या परीक्षेसाठी १५ लाख ५ हजार २७ विद्यार्थी बसले आहेत.तर दहावीच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा ही २ ते २५ मार्च या कालावधीत झाली. यंदा २३ हजार १० शाळांमधील एकूण १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. तसेच या वर्षी उत्तरपत्रिका तपासणी आणि त्यांचं संकलन, शिक्षक संघटनांचा संप, प्रश्नपत्रिकेचा घोळ, पेपरफुटी, यामध्ये बऱ्याच अडचणी आल्या. त्यामुळे निकाल कधी लागणार याकडे सर्वांचं लक्ष हे लागले आहे.

हे ही वाचा:

नागपुरात झळकले आदित्य ठाकरेंचे पोस्टर्स, भावी मुख्यमंत्री…

Gautami Patil चा नादच खुळा!, थेट लग्नाच्या वाढदिवसाला नाच-गाण्याचा कार्यक्रम

Instagram ची सेवा रात्रीपासून ठप्प, जगभरातील लाखो यूजर्स वैतागले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss