Saturday, June 3, 2023

Latest Posts

Marine Drive – Bandra–Worli Sea Link कोस्टल रोड २०२४ पर्यंत होणार खुला?

मुंबईतील मरीन ड्राईव्ह ते वांद्रे-वरळी सी लिंक हा कोस्टल रोडचा दक्षिण मुंबईतील भाग सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.

मुंबईतील मरीन ड्राईव्ह ते वांद्रे-वरळी सी लिंक हा कोस्टल रोडचा दक्षिण मुंबईतील भाग सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. तसेच अनेकांना उत्सुकता आहे की हा रोड कधी पूर्ण होणार ? तर त्या सर्वनसाठी एक खुशखबर म्हणजे हा रोड आता जून २०२४ पर्यंत खुला करण्यात येणार आहे.

कोस्टल रोड या प्रकल्पाचं काम ७४. ३३ टक्के पूर्ण झालं आहे. तसेच या प्रकल्पातील एका बोगद्याचं काम याआधीच पूर्ण झालं आहे तर टनेल बोरिंग मशीनच्या बिघाडानंतर सुद्धा दुसऱ्या बोगद्याचं काम आता दोन टक्के बाकी आहे. तर दुसऱ्या बोगद्याचे काम हे पहिल्या बोगद्याचे काम पूर्ण होणार आहे. तसेच दुसऱ्या बोगद्याचे काम हे २२ ते २५ मे दरम्यान पूर्ण होणार आहे. तसेच य आधी या कोस्टल रोड साठी नोव्हेंबर २०२३ ची डेडलाईनची दिली होती. मरीन ड्राईव्ह ते वरळीपर्यंतचं काम नोव्हेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होईल. तर वरळीपासून पुढे हा कोस्टल रोड-बांद्रा वरळी सी लिंकला जोडण्यासाठी अधिकचा वेळ लागणार आहे.

वरळी ते वांद्रे-वरळी सी लिंक इंटर कनेक्टसाठी ५ ते ६ महिने अधिकचा वेळ लागणार आहे. शिवाय वरळी समुद्रातील एक खांब कमी केल्याने ६११ कोटीचा अधिकचा खर्च वाढणार आहे, कोस्टल रोड प्रकल्पाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर चंद्रकांत कदम यांनी ही माहिती दिली.वरळीच्या समुद्रामध्ये एक खांब कमी केल्याने पूर्ण हा कोस्टल रोड वरळी वांद्रे सी लिंकला जोडण्यासाठी पाच ते सहा महिने अधिकचे लागणार आहेत. वरळीच्या भरावाचं काम नोव्हेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल तिथून सी लिंकपर्यंतचं काम मे २०२४ पर्यंत पूर्ण होईल. कोस्टल रोडचा वरळीच्या समुद्रातील १ खांब कमी केल्याने दोन खांबांमध्ये १२० मीटरचं अंतर असणार आहे. त्यामुळे कोस्टल रोडचा खर्च ६११ कोटींनी वाढणार आहे. तसेच दक्षिण कोस्टल रोड प्रकल्पासाठी १२७२१ कोटी रुपये खर्च होणार आहेत आणि त्यात ६११ कोटींची वाढ होणार आहे.

मुंबई कोस्टल रोड हा मुंबई ते कांदिवली २९ किलोमीटर लांबीचा हा कोस्टल रोड असेल. तसेच दक्षिण कोस्टल रोड हा १०.५८ किमी लांबीला असून प्रकल्पाचा ७० टक्के काम पूर्ण झाले. प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वांद्रे वरळी सी लिंक पर्यंत दक्षिण कोस्टल रोड प्रकल्प असेल. तर एकूण प्रकल्पाचा खर्च १२,७२१ कोटी रुपये आहे. यामध्ये १५. ६६ किमी चे तीन इंटरचेंज आणि २. ०७ किमी चे एकूण दोन बोगद्यांचा समावेश असेल. कोस्टल रोड पूर्ण झाल्यानंतर प्रवासामध्ये ७० टक्के वेळेची बचत आणि ३४% इंजिन बचत होईल ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण त्यामुळे कमी होईल.

हे ही वाचा : 

The kerala story चित्रपटांवर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया, सडलेल्या मनाच्या विचारांना….

Karnataka विधानसभा निवडणुकीसाठी आज होणार मतदान, कुणाची सत्ता येणार?

उन्हाळ्यात घरच्या घरी बनवा, घरगुती मसाला ताक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss