Friday, April 26, 2024

Latest Posts

म्हाडाच्या घराच्या जाहिरातीची प्रक्रिया पूर्ण; त्वरित भरा फॉर्म

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांच्या सोडतीची मागील एक वर्षापासून चर्चा सुरु होती.मुंबईमध्ये स्वतःचे असे घर व्हावे अशी सगळ्यांचीच अपेक्षा असते.

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांच्या सोडतीची मागील एक वर्षापासून चर्चा सुरु होती.मुंबईमध्ये स्वतःचे असे घर व्हावे अशी सगळ्यांचीच अपेक्षा असते. मात्र मुंबईमधील घराच्या किमतींचा विचार करता घराचे दर हे गगनाला चुंबलेले आहे. म्हाडा कडून किमतीचे मुंबई मंडळातील घरांसाठी शेवटची सोडत २०१९ मध्ये काढण्यात आली होती. यात केवळ २१७ घरांचा समावेश होता. अखेर मंडळाने आता 4 हजार 83 घरांच्या सोडतीच्या जाहिरातीची प्रक्रिया पूर्ण केली. त्यानुसार येत्या सोमवारी म्हणजेच २२ मे रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिली आहे.

म्हाडाच्या (MHADA) मुंबई मंडळाच्या (Mumbai Mhada) घरांच्या सोडतीची प्रतीक्षा अखेर संपली आहे. मुंबईतील ४ हजार ८३ घरांसाठी (House) सोमवारी, २२ मे रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. म्हाडाची ही घरं गोरेगाव पहाडी, विक्रोळीच्या कन्नमवारनगर, अँटॉप हिल, बोरिवली, मालाड, दादर, सायन परळ, ताडदेवमध्ये आहेत. २२ मे पासूनच नोंदणी, अर्ज विक्री-स्वीकृतीच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. ही प्रक्रिया २६ जूनपर्यंत सुरु राहणार असून १८ जुलै रोजी वांद्रे पश्चिम इथल्या रंगशारदा सभागृहात सोडत काढण्यात येणार आहे. अखेर मंडळाने आता ४ हजार ८३ घरांच्या सोडतीच्या जाहिरातीची प्रक्रिया पूर्ण केली असून आता पुढील प्रक्रिया चालू करण्यात येणार आहे.

म्हाडाच्या घराच्या बाबतीत काही निकष निर्देशित केलेले असतात. त्यामध्ये अत्यल्प उत्पन्न गट, अल्प उत्पन्न गट, माध्यम उत्पन्न गट, उच्च उत्पन्न गट यामध्ये विभागलेले असते. त्यांच्या उत्पन्नानुसार माडाची घरे हि त्या त्या प्रकारच्या किमतींचा फरक दिसत असतो. २२ मे रोजी ४०८३ घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असून त्यापैकी अत्यल्प उत्पन्न गटासाठी २७८८, अल्प उत्पन्न गटासाठी १०२२, मध्यम उत्पन्न गटासाठी १३२ आणि उच्च उत्पन्न गटासाठी ३९ घरे उपलब्ध करुन दिली आहेत. अत्यल्प उत्पन्न गटात २ हजार ७८८ घरे असून सोडतीमधील अत्यल्प उत्पन्न गटात गोरेगावमधील पहाडी इथल्या पंतप्रधान आवास योजने अंतर्गत १९४७, अँटॉप हिलमधील ४१७ तर, विक्रोळीच्या कन्नमवार नगरमधील ४२४ अशी विभागणी केली आहे. या विभागणीच्या आधारे एकूण 2 हजार 788 घरांचा समावेश आहे.

हे ही वाचा:

समीर वानखेडेंच्या सीबीआय चौकशीचा भाजपाला एवढा त्रास का?, नाना पटोले

अजित पवारांच्या ‘त्या’ विधानावर पृथ्वीराज चव्हाणांनि दिली प्रतिक्रिया

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss