Monday, April 29, 2024

Latest Posts

Uddhav Thackeray गद्दार, सायकिक, त्यांची Shivsena नकली, Narayan Rane यांची सडकून टीका

आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर राज्यात रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. विविध पक्षांमधील नेत्यांमध्ये आरोप -प्रत्यारोप, टीका टिपण्या यांच्या फैरी झाडल्या जात आहेत. अश्यातच, भाजपचे (BJP) नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवसेना उबाठा पक्षाचे (Shivsena UBT) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर सडकून टीका केली आहे. ‘शरद पवार (Sharad Pawar) यांना शिवसेना संपवायची होती. आता शरद पवारांसोबत गेल्यावर शिवसेनेची काय अवस्था झाली आहे? बाळासाहेबांनि हिंदुत्त्वाशी प्रतारणा केली नाही. पण, उद्धव ठाकरे रोज सोनिया गांधींना (Soniya Gandhi) मुजरा करतात,’ अश्या शब्दांत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

यावेळी नारायण राणे म्हणाले, “उद्धव ठाकरे गद्दार आहेत. २०१९ला मोदींच्या नावावर मते मागून निवडून आले. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अनेक विनंत्या करूनही ते आले नाहीत. शेवटी पवारांनी संधी साधली. त्यांना आधीच शिवसेना संपवायची होती. त्यांनी मुख्यमंत्री पदाचं चॉकलेट उद्धव ठाकरे यांना दिलं. जो शिपाई होऊ शकत नाही त्याला मुख्यमंत्रीपद करतो म्हंटल्यावर बाळासाहेबांचं कर्तृत्व सोडलं आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सरकार स्थापन केलं”

पुढे ते म्हणाले, “शरद पवारांसोबत गेल्यावर शिवसेनेची काय अवस्था झाली आहे. डोळ्यांसमोरून ४० आमदार गेले तर काही करू शकले नाहीत. आधी बाळासाहेबांची असली शिवसेना होती, आता उद्धव ठाकरेंची नकली शिवसेना आहे. बाळासाहेब हिंदुत्त्व, अभिमान, त्याग करणारे होते. उद्धव ठाकरे नकली, विकले जाणारे आहेत. “

पुढे त्यांनी उद्धव ठाकरे सायकिक केस असल्याचे सांगत त्यांच्यावर घणाघात केला. ते म्हणाले, “पंतप्रधान मोदी यांच्या कामाचा हिशोब मागणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षात काय केलं? पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना काय काम केलं विचारणाऱ्या उद्धव ठाकरे हे अडीच वर्षात दोन दिवस मंत्रालयात गेले, हे त्यांचं काम. उद्धव ठाकरे सायकिक केस आहे. मोदींना केलेल्या कामांची यादी पत्रकारांना द्या, उद्धव ठाकरेंनी मोदींनी काय काम केली असे विचारल्यावर ती यादी तोंडावर फेकून मारा.”

हे ही वाचा:

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी BJP चा जाहीरनामा प्रसिद्ध, PM Modi यांनी जाहीर केल्या ‘या’ नव्या योजना

Rahul Gandhi यांच्या मोठ्या घोषणा, शेतकरी, महिला, बेरोजगार तरुणांसाठी आश्वासनांचा धडाका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss