Saturday, April 27, 2024

Latest Posts

मुरलीधर मोहोळ यांनी कुठल्या पैलवानला दूध पाजले? त्यांनी बिल्डर लोकांना दूध पाजले; रवींद्र धंगेकरांचा आरोप

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सुद्धा महाविकास आघाडी आणि महायुतीमधला तिढा सुटलेला नाही.

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सुद्धा महाविकास आघाडी आणि महायुतीमधला तिढा सुटलेला नाही. महाविकास आघाडी आणि महायुतीमधील उमेदवार ठरल्यानंतर सुद्धा पुणेकरांकडून आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेतली. या भेटीनंतर भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्यावर टीका केली जात आहे. पुण्याचे महापौर असताना मोहोळ यांनी बापट साहेबांना (Girish Bapat) किती त्रास दिला हे सर्वांनाच माहिती आहे, तसेच त्यांनी कोणत्य बिल्डरांना दूध पाजलं हे देखील पुणेकरांना माहित आहे, असे म्हणत त्यांच्यावर टीका केली आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. पुणेकरांकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. भाजपाकडे पैलवान असेल तर आमच्याकडे वस्ताद आहे, असे म्हणत रवींद्र धंगेकरांनी निशाणा साधला आहे. तसेच पुण्यामध्ये शरद पवार यांच्या ६ सभा होणार असल्याचे देखील बोलले जात आहे. बापट साहेबांना मुरलीधर मोहोळ यांनी किती त्रास दिला, त्यांना किती छळलं आहे सगळ्यांना माहिती आहे, असे रवींद्र धंगेकर म्हणाले.

रवींद्र धंगेकर यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर रवींद्र धंगेकर म्हणाले, आज होळी आहे, वाईट प्रवृत्तीचा नाश होवो. शरद पवारांची भेट घेऊन त्यांचा सल्ला घेतला आहे. शेती ते आयटी पर्यंत शरद पवार यांचे काम आहे. शरद पवार यांना भेटून मार्गदर्शन घेतलं. निवडणुकीचे नियोजन, पक्षाच्या सभा या सगळ्या संदर्भात मार्गदर्शन घेतलं.तसेच शरद पवार यांच्या पुण्यात ६ सभा होणार आहेत. पैलवान हा सगळ्यांचा असतो असं सांगत मुरलीधर मोहोळ यांनी कुठल्या पैलवानला दूध पाजले? त्यांनी बिल्डर लोकांना दूध पाजले, असा आरोप देखील रवींद्र धंगेकर यांनी केला आहे.

हे ही वाचा:

उदयनराजेंनी घड्याळ चिन्हांवर निवडणूक लढवावी, पण कमळ चिन्हांवर राजे ठाम

होळीनिमित्त देशभरातील बाजारपेठेत चिनी वस्तूंवर बहिष्कार | Holi

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss