Thursday, May 2, 2024

Latest Posts

विजय शिवतारे बारामती लोकसभेत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार,बैठकीत एकमताने ठराव मंजूर

लोकसभा निवडणुकीला अवघे काही तास शिल्लक असताना राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत.

लोकसभा निवडणुकीला अवघे काही तास शिल्लक असताना राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. तर अनेक नेत्यांनी निवडणुकीच्या तोंडावर पक्ष प्रवेश केला आहे. बारामती लोकसभा ही अजित पवार यांचा प्रतिष्ठेचा मुद्दा आहे. विजय शिवतारे यांनी आज सासवडमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला आहे.शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार विजय शिवतारे( Vijay Shivatare) हे बारामती लोकसभेला अपक्ष उमेदवार म्हणून उतरणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. यासाठी एकमताने ठराव मंजूर करण्यात आला आहे. यामुळे आता बारामती लोकसभेमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे शिंदे आणि अजित पवार गटात ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

विजय शिवतारे म्हणाले, आज सासवडमध्ये पदाधिकाऱ्यांसोबत सव्वा तास बैठक झाली. या बैठकीमध्ये एकमताने निर्णय घेण्यात आला. बारामती मतदारसंघ हा कोणाचा सातबारा नाही. मी देशातील ५४३ मतदारांपैकी एक आहे. लोकसभेच्या मतदारसंघ आणि मालकी कोणाची नाही. सहा विधानसभेचे मतदारसंघ आहे. आपला स्वाभिमान जागृत होऊन आपण लढलं पाहिजे. अजित पवार २०१९ च्या निवडणुकीमध्ये मी जरी त्यांच्या मुलाविरुद्ध प्रचार केला होता तो राजकारणाचा एक भाग होता आणि माझं कर्तव्य म्हणून मी तो होता. त्यामध्ये वैयक्तिक काही नव्हतं. मात्र ,अजित पवारांनी सभ्यतेची सगळी पातळी ओलांडली. ते म्हणाले की, अजित पवार यांनी नीच पातळी ओलांडूनही मी माफ केलं आहे. त्यांचा सत्कार देखील केला. तरीही त्यांची गुर्मी तशीच होती, अशी टीका विजय शिवतारेंनी केली.

ही जनतेने हातामध्ये घेतलेली निवडणूक आहे. हुकूमशाही सरंजामशाही चालणार नाही. जनता मावळ तसेच बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदार संघातील आम्ही ४१ वर्षे तुम्हाला मत देतो, पुरंदरला काय एक प्रोजेक्ट दिला तो दाखवा? ठराविक काही असतील, पण शेतकऱ्यांना काय दिलं? जे बारामती बागायत आहे ते ब्रिटिश कालापासून आहे, असे देखील विजय शिवतारे म्हणाले. राजकारणात कोणलाही निवडून आणण्यासाठी पॉझिटिव्ह प्रवृत्ती असावी लागते. निवडून आणणार म्हणजे आणणारच. गाव पेटवायला एक नालायक माणूस लागतो काढी ओढायला, पण गाव वसवायला अनेक हात लागतात, त्यामुळे अशी उर्मट भाषा त्यांनी केलेली. म्हणूनच आज त्यांच्या उर्मट भाषेसाठी मी त्यांना माफ केलं.आगामी लोकसभा निवडणुकीत सुप्रिया विरोधात सुनेत्रा. पण अजित पवार हे उर्मट आहेत. म्हणून आम्ही सुप्रिया सुळेंना मतदान करणार आहे, असे विजय शिवतारे म्हणाले.

हे ही वाचा:

झी चित्र गौरव २०२४ सोहळ्यात ‘उषा मंगेशकर’ यांना “जीवन गौरव’ पुरस्कार जाहीर

स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्यास महाराष्ट्रात फिरू देणार नाही; राहुल गांधी यांच्या सभेपूर्वी मनसेचा इशारा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss