Monday, April 29, 2024

Latest Posts

Exclusive: उठा उठा निवडणूक आली, ‘दिघे’ नावाची आठवण झाली!

लोकसभेच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या असल्या तरीसुद्धा महायुतीमध्ये अजूनही जागा वाटपाबाबत तोडगा निघाल्याची चिन्हं दिसून येत नाहीत. युतीमधील तिन्ही घटक पक्षांमध्ये काही जागांवरील वाद अजूनही मिटले नाहीत. काही जागांवर भाजपकडून आपले उमेदवार जाहीर झाले असून ठाकरेंची शिवसेना असलेल्या आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीकडून सुद्धा आपले काही उमेदवार ठरवल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये ठाण्यातील जागांचा सुद्धा समावेश आहे. महायुतीसाठी ठाण्यातून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांना तर त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांच्याकडून केदार दिघे (Kedar Dighe) यांना तिकीट दिले जाणार आहे.

कल्याणची जागा आपल्याकडे ठेवण्यात यश मिळवलेल्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडून मोठा धक्का मिळण्याची शक्यता आहे. कल्याण मतदारसंघातून श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात स्वर्गीय आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना उतरवण्याच्या हालचालींना वेग आला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता मातोश्रीला दिघे कुटुंबाची आठवण झाली आहे. ठाणे जिल्हा म्हटलं की, आनंद दिघे यांचा चेहरा आणि नाव समोर येतं. आजही आपल्या नावाचा दबदबा ठेवलेल्या दिघे कुटुंबाचा जनतेला आधार वाटतो. अशावेळी सक्रिय राजकारणापासून दूर असलेल्या, पेशाने इंजिनियर असलेल्या धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुतण्याला कल्याणच्या रणधुमाळीत उतरवण्याचा निर्णय मातोश्रीने घेतल्याचे विश्वसनीय वृत्त टाईम महाराष्ट्रच्या हाती आले आहे. काही दिवसांपूर्वी सुषमा अंधारे यांनी कल्याण मतदार संघातील काही ठिकाणी भेट दिली होती. सुषमा अंधारे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु कल्याण मतदार संघात मोठ्या प्रमाणात असलेला सुशिक्षित मतदार वर्ग केंद्रित करण्यासाठी किंवा मतदार वर्गाला शिवसेनेकडे आकर्षित करण्यासाठी केदार दिघे यांचे नाव निश्चित करण्यासंबंधी चर्चा सुरू होती.

मागील निवडणुकीला डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात आनंद परांजपे यांनी निवडणूक लढवली होती. आनंद परांजपे (Anand Paranjape) हे राजकारणात पाच वर्षे सक्रिय होते. याशिवाय ते सुशिक्षित असून पेशाने इंजिनियर आहेत. परंतु, डॉ. श्रीकांत शिंदे यांनी त्यांना पराभूत केले होते. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण-डोंबिवलीमधील जनतेला दिलेली पायाभूत सुविधा, रस्त्यांची बांधणी, अन्य विकासकामे, उल्हासनगर-अंबरनाथ परिसरात राबविलेल्या कामांचा व्याप लक्षात घेतला, तर कल्याण-डोंबिवलीची जनता त्यांचे काम विसरू शकणार नाही. त्याउलट, केदार दिघे हे मुलुंडमधील रहिवासी असून ठाण्यात त्यांच्या कामाचा प्रभाव कमी आहे. एकनाथ शिंदे पक्षातू गेल्यांनतर खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्यासोबत शिवसैनिक गेले. त्यानंतर जे शिल्लक राहिलेले शिवसैनिक आहेत, त्यांना टिकवण्यामध्ये जरी केदार दिघे यांना यश आलं असलं तरीही घुसळवण्यामध्ये यश आले नाही. शिवसैनिकांना कार्यान्वित करण्यामध्ये अजूनही केदार दिघे हे पूर्णतः यशस्वी झाले नाहीयेत. श्रीकांत शिंदे आणि केदार दिघे हे दोघेही तरुण असून, दोघेही उच्चशिक्षित आहेत. त्यामुळे मतदार हे भावनांच्या मागे जाणार की विकासाच्या मागे जाणार, हे येणाऱ्या काळात पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हे ही वाचा:

झुंडशाही,पवार पर्व संपवण्यासाठी आपली लढाई – विजय शिवतारे

लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाचा एक उमेदवार जाहीर केल्यानंतर पंकजा मुंडेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाल्या….

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss