Sunday, April 28, 2024

Latest Posts

ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात ‘ठाणे मुक्ती दिन’ साजरा

सह्याद्री प्रतिष्ठान ठाणे जिल्हा आयोजित “ठाणे मुक्ती दिन” या कार्यक्रमाला आमदार संजय केळकर यांनी उपस्थित राहून ‘ठाणे मुक्ती दि’न संग्रामच्या आठवणींना उजाळा दिला.

सह्याद्री प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष व आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्री प्रतिष्ठान ठाणे आयोजित तर्फे “ठाणे मुक्ती दिन” मोठ्या उत्साहात ठाणे मध्यवर्ती कारागृहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे यंदाचे १० वे वर्ष होते. पोर्तुगिजांनी येथील जनतेचे खूप हाल केले. पोर्तुगिजांच्या अत्याचाराला जनता कंटाळली होती. या जाचातून सोडविण्याकरिता त्यांनी बाजीराव पेशवे यांच्याकडे याचना केली असता, २७ मार्च १७३७ साली चिमाजी अप्पा यांनी एका रात्रीत स्थानिकांच्या मदतीने ठाणे किल्ला पोर्तुगिजांच्या तावडीतून सोडविला आणि ठाणे मुक्त केले. या लढाईत बलकवडे, ढमढरे, अंजूरचे नाईक यांनी पराक्रम गाजवला अशी माहिती संजय केळकर यांनी यावेळी  उपस्थितांना दिली. तसेच,       आमदार निरंजन डावखरे यांनी ठाणे मुक्ती दिनाच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

या ऐतिहासिक कार्यक्रमाला आमदार निरंजन डावखरे, सीताराम राणे, विकास पाटील, निलेश कोळी, विशाल वाघ, सुरेश कांबळे, हरी मेजर, लालजी यादव व सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते.

हे ही वाचा:

विजय शिवतारे अनंतराव थोपटे यांच्या भेटीनंतर घेणार ‘या’ मोठ्या नेत्याची भेट मराठवाड्यात शिंदेंच्या शिवसेनेला एकच जागा मिळणार, संभाजीनगरची जागा भाजपाकडे जाण्याची शक्यता Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss