Thursday, May 9, 2024

Latest Posts

संजय राऊत धमकी प्रकरणी पोलिसांनी दिली पहिली प्रतिक्रिया,या तरुणाचा …

मुंबई पोलीस आणि पुणे पोलीस यांच्या गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई केली आहे. राहुल तळेकरला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. अशी माहिती सूत्रांच्या माध्यमांतून मिळाली आहे.

सध्याचा राजकारणात खूप मोठ्मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे. राजकारण हे गुंडप्रवृत्तीचे होताना बघायला मिळत आहे. राज्याच्या राजकारणात नवीन भर म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.तसेच संजय राऊत याना आलेल्या मेसेजमध्ये स्पष्टपणे असे लिहिले आहे की , तुम्ही दिल्लीमध्ये आल्यानंतर तुम्हाला AK -४७ ने उडवून टाकू असा मेसेजमधून उल्लेख करण्यात आला आहे. तसेच याबाबतची शहानिशा पोलिसांकडून करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच संजय राऊत याना आलेल्या मेसेजद्वारे शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यावर संजय राऊत स्वतः प्रसारमाध्यमांशी बोलणार असल्याचे संजय राऊतांनी स्पष्ट केले आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना धमकी देणारा माणूस सापडला आहे. मिळालेल्या माहिती नुसार नशेत असणाऱ्या त्या व्यक्तीने संजय राऊत यांना धमकी दिली आहे असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. परंतु हे प्राथमिक रिपोर्ट आहेत. त्यामुळे यासंदर्भात संपूर्ण तपास केला जाणार आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. आणि त्या व्यक्तीवर कारवाई केली जाणार आहे. उपमुख्यमंत्री नागपूरमध्ये बोलत होते. महाराष्ट्रामध्ये कोणीलाही धमकी देत असेल तर सरकार शांत बसणार नाही. त्या व्यक्तींवर कारवाई होईल असे फडणवीस म्हणाले.

संजय राऊत याना जीवे मारण्यासाठी धमकी देण्यात आली होती. त्यावर तातडीने सूत्र हलवण्यात आले. दिल्लीमध्ये आल्यावर AK47 ने उडवून टाकू असा धमकीचा मेसेज संजय राऊत यांना आला आहे. लॅारेन्स बिश्नोई गॅगकडून हि धमकी मिळाली आहे असा संशय व्यक्त केला जात होता. मात्र हाती आलेल्या माहितीनुसार संजय राऊत धमकी प्रकरणामध्ये पुण्यातून दोन जणांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. चौकशी दरम्यान पोलिसांच्या माहितीच्या आधारे हा तरुण पुण्यातील असून राहुल तळेकर या तरुणाला पुण्यातील गुन्हे शाखेने पुण्यातील खराडी भागातून अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलीस आणि पुणे पोलीस यांच्या गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई केली आहे. राहुल तळेकरला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. अशी माहिती सूत्रांच्या माध्यमांतून मिळाली आहे. त्याच बरोबर या तरुणाची सखोल चौकशी केल्यानंतर असे निदर्शनास आले की , या तरुणाचा कोणत्याही गँगशी संपर्क नाही आणि त्याच्या नांवाचा एकही क्रिमिनल रेकॉर्ड (criminal record) नसल्याचे दिसून येत आहे.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे आम्हाला आलेल्या धमक्यांची चेष्ठा करत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. यावर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. मी गृहमंत्री झाल्यामुळे अनेक लोकांना अडचण झाली आहे. त्या लोकांना मी गृहमंत्री नाही राहिलो तर बरं होईल असे त्यांना वाटत आहे. पण त्यांना मी सांगू इच्छितो की, गृहमंत्री मी राहणार आहे. मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री पदाचा चार्ज दिला आहे. त्यामुळे जे जे चुकीचं काम करतील त्यांना शासन झाल्याशिवाय राहणार नसल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. मी जे कायदेशीर आहे तेच करतो. मी कोणाला घाबरत नाही कायद्यानेच वागतो हे राज्य कायद्यानेच चालेल असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हे ही वाचा : 

सई ताम्हनकरचा नवीन लुक पाहून चाहते घायाळ

नरेश म्हस्के यांनी केला सलग दुसऱ्यांदा गौप्यस्फोट

गृहखात्याचा वचक,दरारा नाही काय?, सुप्रिया सुळे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss