Sunday, April 28, 2024

Latest Posts

आदित्य ठाकरेंच्या कुंडलीत मुख्यमंत्री बनण्याचे योग – ज्येष्ठ पंडित राजकुमार शर्मा

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बंड करून शिवसेनेतून बाहेर पडले आणि एकटेच बाहेर न पडता तब्ब्ल ४० आमदारांना सोबत घेऊन बाहेर पडले.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बंड करून शिवसेनेतून बाहेर पडले आणि एकटेच बाहेर न पडता तब्ब्ल ४० आमदारांना सोबत घेऊन बाहेर पडले. आतापर्यंतच हे सर्वात मोठं बंड असल्यामुळे राज्यातील राजकीय परिस्थिती पूर्णपणे अस्थिर झाली होती. त्यानंतर राज्यात आलेल्या शिंदे सरकारबाहेर अनेकांनी तर्क वितर्क लावले आहेत. याच संदर्भातल्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी ‘टाईम महाराष्ट्र’ ने देशातील ज्येष्ठ भविष्यवेत्ते पंडित राजकुमार शर्मा यांची मुलाखत घेतली आहे. ज्येष्ठ पंडित राजकुमार शर्मा यांनी या मुलाखतीत अनेक गोष्टी उलगडून मान्यवरांच्या कुंडलीनुसार उलगडून सांगितल्या आहेत. त्यांनी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्याविषयी महत्वाचं भाष्य केलं आहे. अनेक गोष्टी या मुलाखतीच्या माध्यमातून त्यांनी समोर आणल्या आहेत. ते म्हणाले एकट्या शिवसेनेच्या प्राबल्यावर नाही पण राज्यातील अनेक लहान लहान पक्षांना एकत्र आणत भविष्यात आदित्य ठाकरे मुख्यमंत्री बनू शकतातं. त्यांच्या कुंडलीत तसा योग दिसतोय पण त्यांना त्यासाठी प्रचंड मेहनत करत शिवसेनेसाठी उर्जा द्यावी लागेल.

हे ही वाचा : धोक्याची घंटा! सीएम शिंदे १९ नोव्हेंबर नंतर जागते रहो

२०१९ मध्ये एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवण्याचा योग होता. मात्र त्यांना नशिबाने हुलकावणी दिली.आदित्य ठाकरे यांच्या कुंडलीचा विचार केला तर, २०३५ या वर्षापर्यंत त्यांना गुरुची महादशा लागली आहे. पुढील येणाऱ्या दिवसात महाविकास आघाडी होते कि विकास आघाडी होते? कोणता पक्ष कोणा सोबत मिळेल याचा अंदाज लावता येणार नाही अशी राजकीय अस्थिरता निर्माण होऊन कधीही काहीही होऊ शकते असं सांगून शर्मा म्हणाले, मायावती -मुलायम सिंग यांची युती देशांचे पाहिलीय, लालू प्रसाद हे नितीश कुमार यांच्या सोबत जुळवून घेतानाही आपण बघितलय . राजकारणात कधीही काहीही होऊ शकते. कुणीच कुणाला कायम जवळ ठेवत नाही किंवा दूर ही लोटत नाही, असंही ज्येष्ठ पंडित राजकुमार शर्मा यांनी सांगितले आहे.

ज्येष्ठ पंडित राजकुमार शर्मा यांनी सर्वात मोठा दावा केला आहे कि, २०३५ पर्यंत आदित्य ठाकरे यांच्या कुंडलीत मुख्यमंत्री बनण्याचे देखील योग आहेत. आता २०२२ मध्ये आपण आहोत पण २०२८ नंतर आदित्य ठाकरे हे काही पक्षांना एकत्र घेऊन मुख्यमंत्री पदासाठी निवडणुकीला सामोरे जाऊ शकतील पण त्यासाठी त्यांना शिवसेना एकसंघ ठेवावी लागेल अशी भविष्यवाणी ज्येष्ठ पंडित राजकुमार शर्मा यांनी केली आहे.

हे ही वाचा : 

भविष्यात उद्धव ठाकरे यांच्या व्यासपीठावर चौघेच दिसतील, बावनकुळेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कळवा पुलाच्या मार्गिकेचं उदघाटन

मुंबई विमानतळ कस्टमने एकाच दिवसात केले ६१ किलो सोने जप्त, ७ जणांना अटक

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss