Friday, April 26, 2024

Latest Posts

राहुल गांधींना पासपोर्ट मिळताच आज ते अमेरिकेसाठी रवाना

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना एका स्थानिक न्यायालयाकडून एनओसी मिळाली आहे. २८ मे रोजी राहुल गांधी यांना त्यांचा पासपोर्ट मिळाला. राहुल गांधी यांना पासपोर्ट मिळाल्यानंतर आता ते आज अमेरिकेसाठी रवाना होणार आहेत.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना एका स्थानिक न्यायालयाकडून एनओसी मिळाली आहे. २८ मे रोजी राहुल गांधी यांना त्यांचा पासपोर्ट मिळाला. राहुल गांधी यांना पासपोर्ट मिळाल्यानंतर आता ते आज अमेरिकेसाठी रवाना होणार आहेत. सुरत न्यायालयाने राहुल गांधींना मानहानीचा प्रकरणामध्ये दोषी ठरवले होते त्यानंतर त्यांची खासदारकी देखील रद्द करण्यात आली होती. त्यामुळे राहुल गांधींना त्यांच्या राजनैतिक प्रवासाचे दस्ताऐवज परत करावे लागले होते. पासपोर्ट मिळण्यासाठी राहुल गांधी यांनी दिल्लीच्या न्यायालयामध्ये दहा वर्षासाठी एनओसी मिळण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. आता त्यांना ३ वर्षासाठी एनओसी मिळाली आहे.

२८ मे रोजी राहुल गांधींना पासपोर्ट देण्यात आले. दिल्लीमधील न्यायालयाने राहुल गांधी यांना दहावा वर्षांऐवजी तीन वर्षांसाठी सामान्य पासपोर्ट जारी करण्यासाठी एनओसी प्रमाणपत्र देण्याचे निर्देश मागील शुक्रवारी देण्यात आले होते. त्याचबरोबर राहुल गांधी यांच्याकडे दहा वर्षासाठी एनओसी मागण्याचे कोणतेही ठोस आणि वैध कारण नव्हत असा युक्तिवाद सुब्रमण्यम यांच्याकडून न्यायलयात करण्यात आला होता.

राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्यामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो असा युक्तिवाद करण्यात आला होता. त्यानंतर कोर्टाने निर्णय देण्यासाठी एक दिवसाचा अवधी मागितला होता. २६ मे रोजी राहुल गांधींना तीन वर्षासाठी एनओसी प्रमाणपत्र मिळण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे आता राहुल गांधी यांना तीन वर्षांनी पुन्हा एकदा पासपोर्टसाठी आवश्यक असणाऱ्या एनओसी प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा लागणार आहे.

हे ही वाचा:

IPL २०२३ च्या फायनलला वरुणराजाची उपस्थिती ; वादळी वाऱ्यासह आगमन

IPL 2023 Final, आज रंगणार महामुकाबलाचा थरार… कोण पटकवणार IPL 2023 मान? जाणून घ्या सविस्तर माहिती

दिल्लीच्या जंतरमंतरवर कुस्तीपटू आणि पोलिसांमध्ये झाला राडा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss