Friday, April 26, 2024

Latest Posts

आशिष देशमुखांनी घेतली उपमुख्यमंत्र्यांची भेट, चर्चेला उधाण

आज आशिष देशमुखांनी (Ashish Deshmukh) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. आशिष देशमुख सध्या काँग्रेसमधून निलंबित आले आहेत.

आज आशिष देशमुखांनी (Ashish Deshmukh) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. आशिष देशमुख सध्या काँग्रेसमधून निलंबित आले आहेत. त्यामुळे ते आता भाजपमध्ये प्रवेश करणार का? अशा चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगल्या आहेत. त्याचबरोबर आशिष देशमुख हे सावनेरमधून भाजप पक्षाकडून निवडणूक लढवणार आहेत असाही अंदाज लावला जात आहे. परंतु देशमुखांनी घोडामैदान अजूनही दूर असल्याचे सांगून यावर बोलणे टाळले आहे. माध्यमांशी बोलताना आशिष देशमुख म्हणाले की, राजकारणामध्ये कोणीही कोणाचे कायमचे शत्रू किंवा मित्र नसतात. २०१९ ची विधानसभा निवडणूक मी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामध्ये लढलो होतो. राजकारणामध्ये काळाचे विरोधक आज मित्र आहेत असे आशिष देशमुख म्हणाले.

पुढे आशिष देशमुख म्हणाले की, पक्षविरहित राजकीय संस्कृती राज्यामध्ये आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याशी कौटुंबिक संबंध आहेत. कौटुंबिक संबंध हे पक्षपलिकडे असतात. मला अपेक्षा आहे की निलंबन मागे घेऊन ऍक्टिव्ह करण्यात येईल. २००९ मध्ये सावनेरमध्ये लढलो. २०१४ मध्ये काटोलमध्ये अनिल देशमुख यांचा पराभव केला. त्यानंतर मी २०१९ ची निवडणूक मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध लढली. सध्यातरी पक्ष बदलण्याचा प्रश्न उद्भवत नाही असे आशिष देशमुख म्हणाले.

पुढे आशिष देशमुख म्हणाले की, अजून घोडामैदान लांब आहे अजुनपर्यत कोणताही अर्थ लावू नका. भाजपचे दिग्गज नेते भेटीला आले आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांची राज्यामधील नेता म्हणून ओळख आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमामधून विदर्भामध्ये विकासाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. याचा फायदा विदर्भातील शेतकऱ्यांना मिळाला अशी अपेक्षा आशिष देशमुख यांनी व्यक्त केली आहे.

हे ही वाचा : 

RCB vs SRH, कोहली मारणार बाजी की शेवटच्या सामन्यामध्ये सनरायजर्स हैदराबाद होणार विजयी

भारतीय स्टेट बँकेने ग्राहकांना दिले भामट्यांकडून खबरदारी बाळगण्याचे आव्हान

शुभमन गिलच्या नव्या चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss