Tuesday, April 30, 2024

Latest Posts

Udayanraje Bhosale दिल्लीच्या तख्तासमोर झुकले, Jitendra Awhad यांची टीका

सातारा लोकसभा मतदारसंघातून (Satara Loksabha Constituency) निवडणूक लढवण्यासाठी महायुतीमधील भाजप (BJP)आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) यांनी जोर लावला होता. आता सातारच्या जागेचा तिढा सुटला असून भाजपच्या उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्याविरुद्ध उदयनराजे भोसले निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar) नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी पत्रकार परिषद घेऊन टीका केली. सातारा लोकसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी उदयनराजे भोसले दिल्लीच्या तख्तासमोर नतमस्तक झाल्याचे, यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

उदयनराजे भोसले यांना महायुतीकडून सातारा लोकसभा निवडणुकीसाठी आज सकाळी उमेदवारी जाहीर करण्यात आली. यावर आज (मंगळवार, १६ एप्रिल) जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन भाष्य केले. आव्हाड म्हणाले, “छत्रपतींची कोल्हापूरची गादी असो कि सातारची.. आम्हाला ह्या गाद्यांविषयी आदर आहे. छत्रपतींच्या वंशजांनी हि गादी आचारविचारांचे पालन करून चालवली पाहिजे. पण उदयनराजे यांची कृत्ये – दुष्कृत्ये सगळीकडेच बघितली आहेत. त्यांचं वागणं गादीचा सन्मान ठेवला तर ठीक होते. महाराष्ट्राला एक परंपरा आहे. आपण कोणासमोर झुकत आहोत याचा विचार उदयनराजे यांनी केला पाहिजे होता.पण ते साताऱ्यातून तिकीट मिळवण्यासाठी चार दिवस दिल्लीत होते. दिल्लीच्या तख्तासमोर ते चार दिवस ‘मला तिकीट द्या,तिकीट द्या’ करत होते. हि गोष्ट लोकांना फारशी आवडणारी नाही.”

सातारा लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतर्फे शशिकांत शिंदे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्याबाबत बोलताना आव्हाड म्हणाले, “शशिकांत शिंदे अत्यंत गरीब घरातून आलेला माणूस आहे. त्याची घरची परिस्थिती काय होती हे राजेंनाही माहीत आहे. शरद पवारांनी कायम ज्याच्याकड़े नेतृत्व करायची ताकद आहे त्याला पुढे केलं आहे. शशिकांत शिंदेनी अशा पार्श्वभूमीवर राजेंना अंगावर घेतल आहे. त्यामुळे खरा रयतेचा प्रतिनिधींना शशिकांत शिंदे आहे.”

हे ही वाचा:

देशाला PM Modi यांच्यासारख्या खमक्या नेतृत्वाची गरज – Ajit Pawar

Sangali मध्ये MVA मध्ये बंडखोरी, Vishal Patil यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss