Saturday, April 27, 2024

Latest Posts

२०२४ च्या निवडणुकीच्या संदर्भात ठाकरे गटाच्या नेत्यांचा मोठा दावा

येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या काळात पक्ष पक्षामध्ये तणावाचे वातावरण बघायला मिळत आहे. २०२४ च्या निवडणुकांसाठी पक्षात नक्की जागा कोणाला द्यावी यासाठी संभ्रम चालूच आहे. येत्या निवडणुकीमध्ये पक्षांतर्गत वाद देखील होताना बघायला मिळत आहे. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात विकासाचा दुष्काळ पडला आहे.

येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या काळात पक्ष पक्षामध्ये तणावाचे वातावरण बघायला मिळत आहे. २०२४ च्या निवडणुकांसाठी पक्षात नक्की जागा कोणाला द्यावी यासाठी संभ्रम चालूच आहे. येत्या निवडणुकीमध्ये पक्षांतर्गत वाद देखील होताना बघायला मिळत आहे. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात विकासाचा दुष्काळ पडला आहे. मायबाप जनता, विद्यार्थी, तरुण, स्त्रिया कोणीही खासदारांच्या कामकाजावर समाधानी नाही. त्यामुळे आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत खासदार भावना गवळी यांचे डिपॉझीट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही, असे मत युवासेना पश्‍चिम विदर्भ सचिव सागर देशमुख यांनी व्यक्त केले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून गुरुवारी युवा सेना पदाधिकारी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अमरावती येथील युवा नेते तथा पश्‍चिम विदर्भ सचिव सागर देशमुख यांनी विशेष उपस्थिती लावली. यवतमाळ-वाशिम लोकसभा क्षेत्राचा संपूर्ण आढावा पदाधिकार्‍यांकडून घेतला.त्यावेळी खासदार भावना गवळी यांच्या कर्तव्यशून्य कामगिरीबद्दल सर्व समाजघटकांमध्ये मोठ्याप्रमाणात नाराजी आहे. कोणतेही विशेष काम त्यांनी त्यांच्या कार्यकाळात केले नसल्याचे वास्तव यावेळी सांगण्यात आल्याने सागर देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधताना गवळी यांच्यावर जोरदार टीका केली.

सागर देशमुख यांनी प्रसार माध्यमांसमोर बोलताना याचा उलगडा केला आहे त्याच बरोबर शिवसेनाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वा संदर्भात बोलायचे झाले तर विदर्भातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात विविध घटकांसाठी मोठ्या प्रमाणात काम करण्यात आले आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत भावना गवळी यांना जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नसल्याचेही सागर देशमुख यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

नव्या संसद भवनाच्या सोहळ्यावर सुप्रिया सुळेंनी दिली प्रतिक्रिया, एक फोन…

विनायक राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेंवर केली जोरदार टीका, RSSची स्क्रिप्ट वाचतात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss