Wednesday, May 8, 2024

Latest Posts

Karnataka निकालानंतर Devendra Fadnavis यांची प्रतिक्रिया, सरकार कायम बदलत असतं

आज कर्नाटकात काँग्रेस बाजी मारणार की भाजप सत्तेत कायम राहणार याची उत्सुकता ही सर्वांना लागली होती. संपूर्ण देशाचं लक्ष हे कर्नाटकच्या निकालाकडे लागले होते. कर्नाटकात काँग्रेसचा बहुमताने आघाडीवर आहे . तर भाजपचा पराभव हा झालेला आहे.पहिल्या अर्ध्या तासातच कर्नाटकाचे चित्र हे स्पष्ट झाले होते. या सर्व पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी संवाद साधला आहे.

आज माध्यमांशी बोलत असताना देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत की कुठलंच सरकार हे रिपीट होत नाही. सातत्याने ते बदलत असते. एखादा अपवाद सोडला तर यात बदल हे कायम होत असतात. यावेळी तो ट्रेंड आम्ही कदाचित तोडू शकू स आम्हाला वाटलं पण ते आम्ही तोडू शकलो नाही. २०१८ साल जेव्हा आमच्या १०६ जागा आल्या होत्या त्यावेळी आम्हाला ३६ % मतं होती आता आम्हाला ३५. ०६%मतं आहेत. म्हणजे अर्ध्या टक्क्यापेक्षा कमी मतं आमची कमी झाली आहेत. ०.०४% इतकी मतं आम्हची कमी झाली आहेत. म्हणजे २०१८ साली जितकी मतं मिळाली होती तितकीच मतं मिळाली आहेत. आणि जवळपास ४० जागा कमी झाल्या आहेत असं आज देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

तसेच फडणवीस पुढे म्हणाले आहेत २०१८ मध्ये काँग्रेस ला ३८ % मतं होती आणि जेडीएस ला १८%मतं होती. यामध्ये जेडीएस ची ५ %मतं कमी झाली आहेत आणि ही ५ %मतं काँग्रेसकडे ट्रांसफर झाली आहेत आणि त्यामुळे काँग्रेसचा विजय हा झाला आहे. भाजपची मतं ही कुठेही कमी झालेली नाहीत असं देखील आज फडणवीस म्हणाले आहेत. तसेच फडणवीस यांनी विरोधकांना देखील खोचक टोला हा लगावला आहे. अंडी यावेळी बोल्ट असताना ते म्हणाले, काही लोकांना असं वाटत ते देशच जिंकले पण त्यांना माझा इतकाच सल्ला आहे की पूर्वीचेही विधानसभेचे झालेले निकाल आणि त्यानंतर लोकसभाचे झालेलं निकाल हे त्यांनी बघितले पाहिजे.

तसेच पुढे फडणवीस म्हणाले आजच उत्तर प्रदेशच्या लोकल बॉडीचे निकाल हे आले आहेत आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टी ही व=वन साईड निवडून आलेली आहे. त्यामुळे कर्नाटकचा उदहारण देऊन देश जिंकल्याचा जे काही लोक सांगतात यांच्यात कुठलाही अर्थ नाहीय. असं देखील फडणवीस म्हणाले आहेत. तसेच पुढे फडणवीसांनी विरोधकांना अजून एक टोला लगावला आहे आणि म्हणाले आहेत की, बेगाने शादी मैं अब्दुला दिवाणा … असं देखील काही लोक बघायला मिळत आहेत. कि ज्यांच्या पक्षाला कर्नाटकात काही यश नाही, जागा नाही, ज्यांचं कुठे वर्चस्व नाही अशीही काही लोक नाचताना दिसत आहेत. तसेच फडणवीस पुढे म्हणाले, कर्नाटकात जे काही झाले त्याचा कोणताही परिणाम हा देशातही होणार नाही आणि महाराष्ट्रातही होणार नाही. देशात मोदींचे च सरकार येणार आणि महाराष्ट्रात भाजप सेना युतीचंच सरकार येणार.

हे ही वाचा:

भाजपा हा पराभव सहन करणार नाही,काहीतरी कुरखुड्या भाजप गोट्यातून सुरूच राहतील – पृथ्वीराज चव्हाण

Karnataka Assembly election 2023, ‘या’ पक्षांना मिळाली NOTA पेक्षाही कमी मतं

Karnataka Assembly election 2023 Result, कर्नाटकात सत्तापालट, काँग्रेसचा दणदणीत विजय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss