Tuesday, April 30, 2024

Latest Posts

Uddhav Thackeray PC Live, आता राणेंनी आत्मा विकला असेल, बारसूतून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आज कोकण दौऱ्यावर आहेत आणि आज त्यांनी बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या संदर्भामध्ये लोकांशी चर्चा केली आहे.

आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आज कोकण दौऱ्यावर आहेत आणि आज त्यांनी बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या संदर्भामध्ये लोकांशी चर्चा केली आहे. यादरम्यान त्यांनी बारसूमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि ते म्हणाले की, नाणेर येथे प्रकल्प होऊ नये हे तेथील ग्रामस्थांच्या विचार विचारात घेऊन आम्ही हे पॉल उचलत आहोत. हे सर्व आम्ही आमच्या मनाने प्रकल्पाला विरोध किंवा प्रकल्पाला समर्थन करत नाही. कोणालाही हा प्रकल्प हवा असेल तर तो प्रकल्प जरूर व्हावा. माविआ काळामधले प्रकल्प आम्हाला द्या. राख आम्हाला आणि रांगोळी त्यांना का? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी सरकारला केला आहे. प्रदूषणकारी प्रकल्प गुजरात मध्ये नेऊन टाका.

माझ्याकडे मुख्यमंत्री पद असते तर मी जनतेला त्या प्रकल्पाचे प्रेझेंटेशन दाखून त्याचा निर्णय मी घेतला असता असे उद्धव ठाकरे म्हणाले. सरकार नुसते पत्राचे भांडवल केले जात आहे. जर हा प्रकल्प चांगला आहे तर महाराष्ट्रातले सगळे पोलीस बारसूमध्ये का आणले. घराघरांमध्ये पोलीस का घुसवले आहेत. लाठीचार का केला जात आहे तर याचे उत्तर मिळत नाही. जसा मी आज गावकऱ्यांमध्ये आलो तसे त्या सुपार्या बहाद्दरांनी येऊन द्यावे प्रेझेन्टेशन असे उद्धव ठाकरे यांनी सरकारला आव्हान केले आहे. जर जनता विरोध करत असेल तर मी सुद्धा त्याचा विरोध करेल असे उद्धव ठाकरे म्हणाले.

बारसूच्या समर्थकांना रिफायनरी प्रकल्प हवा आहे पण मग माझ्याच वेळच प्रकल्प तुम्ही नाचवत आहेत पण मग माझ्या काळामध्ये वेदांत फॉक्स का येत होता आणि तो प्रकल्प गुजरातला का घालवला एयरबस का दिला? चांगले प्रकल्प जे होते ते सगळे गुजरातला. महाराष्ट्राला राख आणि गुजरातला रांगोळी? असा प्रश्न उपस्थित केला आहे. आमची भूमिका एकत्र आहे जर प्रकल्प चांगला असेल गावकऱ्यांची सहमती असेल तर आम्ही नाही म्हणणार नाही पण ज्या पद्धतीने दडपशाही चालू आहे आणि म्हणूनच ती दडपशाही बघितल्यानंतर नक्कीच यांच्यामध्ये काही तरी काळभेद आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले. प्रकल्पाच्या संदर्भामध्ये जन्मात चाचणी घेण्यापेक्षा तुम्ही लोकांसमोर जायला पाहिजे.

हे ही वाचा : 

घरातील जुने, मळकटलेले सोफे स्वच्छ करायचेत? मग वापरा ‘या’ सोप्या टिप्स

अजित पवारांकडून निर्णयाचे स्वागत, तर पुढील ८ दिवस करणार राज्यभर दौरा

Raj Thackeray यांनी काढले अजित पवारांचे व्यंगचित्र, म्हणाले…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss