Saturday, April 27, 2024

Latest Posts

मुकेश अंबानींनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; ‘वर्षा’ वर झाली तासभर चर्चा

या भेटीत दोघांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी साधारण तासभर चर्चा केल्याची माहिती आहे.

उद्धव ठाकरे आणि गौतम अदानी यांच्यात झालेल्या भेटीनंतर आता रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख आणि सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनीदेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. मुकेश अंबानी आणि त्यांचा मुलगा अनंत अंबानी यांनी शनिवारी रात्री उशीरा वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदेंची भेट घेतली. या भेटीत दोघांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी साधारण तासभर चर्चा केल्याची माहिती आहे. या भेटीबद्दल अत्यंत गुप्तता बाळगण्यात आली होती. मध्यरात्र उलटल्यानंतर मुकेश अंबानी (Mukesh Ambani) मुलासह वर्षा बंगल्यातून बाहेर पडले. मात्र, यावेळी मुकेश अंबानी आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यात नेमकी काय चर्चा झाली, याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही.

काही दिवसांपूर्वीच देशातील सर्वात श्रीमंत आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात श्रीमंत व्यक्ती समजले जाणारे उद्योगपती गौतम अदानी यांनी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. ज्याप्रमाणे एकनाथ शिंदे आणि मुकेश अंबानींमध्ये तासभर चर्चा झाली तशीच दीर्घकाळ चर्चा अदानी आणि उद्धव ठाकरे यांच्यातही झाली होती. गौतम अदानी आणि उद्धव ठाकरे यांच्या ब्रटिनानंतर अवघ्या दोन दिवसांमध्येच मुकेश अंबानी यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षावर जाऊन भेट घेतल्यामुळे अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. देशातील दोन बड्या आणि आघाडीच्या उद्योगपतींनी नेहमीच चर्चेत असलेल्या नेत्यांची भेट घेतल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

राज्यात सत्तापालट झाल्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हातातील सर्व अधिकार गेले आहेत. सध्या शिंदे – फडणवीस सरकार सत्तेत असल्यामुळे त्यांच्याकडे सगळॆ सत्ता आणि अधिकार आहेत, मग अशा परिस्थितीत गौतम अदानी (Gautam Adani) उद्धव ठाकरेंची भेट का घेतली असेल, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. गौतम अदानी आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या भेटीत साधारण तासभर चर्चा झाली होती. अदानी आणि ठाकरे यांची ही भेट धारावी पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात असल्याचा अंदाज वर्तवला जातोय. मात्र, मुख्यमंत्री शिंदे आणि मुकेश अंबानी यांच्यात नेमकी काय चर्चा झाली, याची माहिती अजूनही समोर आलेली नाही.

हे ही वाचा:

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे: परराष्ट्र मंत्री एस जयशंकर

शिंदे – फडणवीस सरकारने केली जिल्हानिहाय पालकमंत्रीपदाची यादी जाहीर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss