Monday, April 29, 2024

Latest Posts

Eknath Shinde यांनी रडीचा डाव बंद करावा, Raju Shetti यांचे वक्तव्य

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज (सोमवार, १५ एप्रिल) कोल्हापूर मधील दसरा चौक येथे विराट शक्तिप्रदर्शन केले.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर राज्यात रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. विविध पक्षातील नेतेमंडळी विरोधी पक्षातील नेत्यांवर आरोप-प्रत्यारोप, टीका टिपण्या करत आहेत. अश्यातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti)यांनी आज (सोमवार, १५ एप्रिल) कोल्हापूर मधील दसरा चौक येथे विराट शक्तिप्रदर्शन केले. आगामी लोकसभा निवडणुकीत आपणही तयार असल्याचे यावेळी राजू शेट्टी यांनी दाखवले. यावेळी बोलताना राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) तसेच जयंत पाटील (Jayant Patil) आणि सतेज पाटील (satej Patil) यांच्यावरही टीका केली.

राजू शेट्टी यांनी बैलगाडीने जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवडणुकीचा अर्ज भरला. तत्पूर्वी, त्यांनी ऐतिहासिक दसरा चौकात भाषण देत, ‘खोक्यांचा बाजार करणारी झुंड माझ्याविरोधात एकवटली आहे,’ असे वक्तव्य केले. ते म्हणाले, “खोक्यांचा बाजार करणाऱ्या झुंडी एका बाजूने माझ्या विरोधात उभी आहे, तर दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य लोक आणि विचारवंत माझ्यासोबत उभे आहेत. म्हणून, आज चौथ्यांदा लोकसभेसाठी स्वतंत्रपणे अर्ज दाखल करत आहे.” “देशात बेरोजगारीची समस्या वाढली आहे. त्यामुळे आर्थिक धोरणे बदलल्याशिवाय बेरोजगारीची समस्या संपणार नाही. म्हणून, निवडून आल्यानंतर संसदेत बेरोजगारीवर आवाज उठवू.” ते पुढे म्हणाले.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील परिस्थितीवर भाष्य करताना राजू शेट्टी म्हणाले, “सगळे कारखानदार हातकणंगलेमध्ये काड्या करत सामील झाले आहेत. उद्धव ठाकरे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून जागा देणार नव्हते पण कुठून चाव्या फिरल्या काय माहित? यामध्ये जयंत पती, सतेज पाटील यांचा हात असावा,”असा आरोप त्यांनी केला. पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ईडी वर टीका केली. शेट्टी यांच्या कार्यकर्त्यांवर ईडीच्या नोटीस आल्याने ते टीका करत म्हणाले, “एकनाथ शिंदे यांनी रडीचा डाव बंद करावा. विरोधकांमधील काहीजण ईडीला घाबरून भाजप मध्ये जात आहेत. मात्र, मी ईडीला हिंगलत नाही. मला ईडीने नोटीस पाठवावी. ईडी कार्यालयाविरोधात मोर्चा काढावा अशी परिस्थिती आहे.” असे ते पुढे म्हणाले.

हे ही वाचा:

Narendra Modi यांच्या सर्व गॅरंटी खोट्या, खोटं बोल पण रेटून बोल हीच BJP ची पद्धत – Mallikarjun Kharge

Shrikant Shinde Foundation मध्ये ५०० कोटींचा गैरव्यवहार, Sanjay Raut यांचे PM Modi यांना पत्र

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss