Saturday, April 27, 2024

Latest Posts

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जागा केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या पारड्यात

निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या.

निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या. त्यानंतर आज लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी अधिसूचना जारी केल्या जाणार आहेत. तरीसुद्धा महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. लोकसभेतील काही जागेंवरून महाविकास आघाडीमध्ये अजूनही मतभेद आहेत. काल ठाकरे गटाकडून १७ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीने आपल्या जागा जाहीर केल्या. तर रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेवरुन (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Constituency) मागील काही दिवसांपासून सगळीकडे चर्चा रंगल्या होत्या. अखेर या जागेचा तिढा सुटणार आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची जागा भाजपाला देण्यात आली असून ही जागा केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांना देण्यात आली आहे. राणे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आजच नारायण राणेंच्या उमेदवारीची घोषणा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून २००९ साली नारायण राणेंचे पुत्र निलेश राणे निवडणूक जिंकून आले होते. त्यानंतर २०२४ आणि २०१९ अशा दोन्ही वेळी निलेश राणेंचा पराभव करण्यात आला होता. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत राणे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग ही शिवसेनेची जागा आहे. त्यामुळे ही जागा शिवसेनाच लढेल. शिवसेनेनं जागा लढावी,अशी माझी इच्छा आहे. पण याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील,असे काही दिवसांआधी केंद्रीय मंत्री उदय सामंत म्हणाले होते. त्यामुळे या जागेवर शिवसेनेने दावा केला होता. मात्र नारायण राणेंनीही रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेची जागा ही भारतीय जनता पक्षाची असून भारतीय जनता पक्षच ही जागा लढवणार, असा दावा राणेंनी केला होता.

रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील जागा शिवसेना भाजप युतीवेळी शिवसेनेला मिळाली होती. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची शिवसेना या जागेवर दावा करू शकते,असे उदय सामंत यांनी अनेकदा बोलून दाखवले आहे. उदय सामंत यांचे बंधु किरण सामंत हे रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा लढण्यासाठी इच्छुक असल्याच्या चर्चा सगळीकडे रंगल्या होत्या. मात्र आता ही जागा नारायण राणे लढवणार आहेत .

हे ही वाचा:

विजय शिवतारेंनी घेतली मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट; भेटीनंतर शिवतारे भूमिका स्पष्ट करणार

अमोल कीर्तिकारांना ठाकरेंकडून उमेदवारी जाहीर | Amol Kirtikar | Lok Sabha 2024

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss