Friday, April 26, 2024

Latest Posts

सचिन आता करणार “या” साठी बॅटिंग

भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी त्यांच्या आठवणीतील एक किस्सा सांगितलं. हा किस्सा सांगण्या मागचं कारण देखील तसेच काहीतरी होत.

भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी त्यांच्या आठवणीतील एक किस्सा सांगितलं. हा किस्सा सांगण्या मागचं कारण देखील तसेच काहीतरी होत. वयाच्या ५वय वर्षापासून सचिनने हातात क्रिकेची बॅट धरली आणि त्यानंतर त्याची क्रिकेटची जर्नी सुरु झाली. त्यानंतर वयाच्या १६ व्या वर्षी पहिल्यांदी सचिन तेंडुलकर भारतासाठी खेळाला. एकीकडे IPL २०२३ च्या चेन्नई सुपर किंग्जचा पूर्ण संघ यंदाच्या आयपीएलमध्ये महेंद्रसिंह धोनीला विजेतेपद जिंकून देण्यासाठी खेळला, त्याचप्रमाणे २०११ साली वर्ल्डकप स्पर्धेत सचिन तेंडुलरकरला वर्ल्डकप जिंकून देण्यासाठी टीम इंडिया खेळली होती. त्यामुळे चेन्नईनं मंगळवारी पहाटे आयपीएलचं पाचवं जेतेपद जिंकल्यानंतर सचिन तेंडुलकरला खांद्यावर घेऊन वानखेडेवर फिरणाऱ्या भारतीय संघाच्याही आठवणी ताज्या झाल्या. सचिन तेंडुलकरभोवतीचं ते वलय अजूनही कायम असल्याचं अजूनही दिसून येतं. साची तेंडुलकर यांनी त्याच्या याच वलयाच्या माध्यमातून मौखिक आरोग्याबाबत संदेश देण्यासाठी एक किस्सा सांगितलं.

राज्य सरकारने अभिवन मोहीम सुरू केली आहे. राज्य सरकारने मौखिक आरोग्यावर जनजागृती करण्यासाठी स्वच्छ मुख अभियानाची सुरुवात केली आहे. या अभियानाचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा स्वच्छ मुख अभियानाचा स्माईल अॅम्बेसिडर आहे. यासंदर्भात आज झालेल्या कार्यक्रमात बोलताना सचिन तेंडुलकरनं गुटखा, तंबाखू अशा गोष्टींपासून लांब राहण्याचं आवाहन उपस्थितांना केलं. यावेळी सचिन तेंडुलकरनं त्याच्या वडिलांची एक आठवण सांगितली. हा कार्यक्रम देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला. जेव्हा त्याने या स्माईल अॅम्बेसिडर संबंधी कॉन्ट्रॅक्ट साइन केले तेव्हा सचिन याने एक आठवण शेअर केली.

सचिन तेंडुलकर यांनी तंबाखू वगैरेचा वापर काही लोक करत असतात. आणि त्यामुळे आपल्या शरीराला त्याची हानी देखील होते. आणि आपले कुटुंब उध्वस्त देखील होत असतात. अशा प्रकारची चित्र आपण बघतच असतो. आपण आम्ल पदार्थांचे सेवन त्यांच्या समोर करत असतो आणि ती लहान मुलं-मुली त्यांना बघतात. त्यांनाही असं वाटतं की हे एवढं घेतायत, आपणही घेऊन बघू एकदा. तेही घेतात. त्यांना हे कळतच नाही की हळूहळू त्यांना या गोष्टीचं व्यसन लागतं. त्याचा परिणाम थेट तोंडाच्या कर्करोगात होतो. पण या लोकांना हे समजत नाही की तोंडाच्या कर्करोगाने काय परिणाम होतात. याचा फक्त त्यांना त्रास होत नाही, त्याचा त्यांच्या आसपासच्या सर्वांनाच त्रास होतो. बऱ्याच कुटुंबांसमोर आर्थिक अडचण असते. त्यात आजाराचं ओझं सांभाळणं कठीण होऊन जातं. पण ही समस्या तुम्ही स्वत: ओढवून घेतलेली असते. प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उतार असतातच. पण याला तुम्ही काहीही कारण देऊ शकत नाही”, असं सचिन यावेळी म्हणाला.

हे ही वाचा:

गौतमी पाटीलच्या आडनावावरून नवीन वाद : संभाजीराजांनी घेतली वादात उडी

Sameer Wankhede यांच्या अडचणीत वाढ, ३० मे रोजी कुटूंबियांची चौकशी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss