Friday, April 26, 2024

Latest Posts

१६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा, ठाकरे गटाची मागणी

ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्षांना १६ आमदारांच्या अपात्रतेची संदर्भात ७९ पाणी निवेदन देणार आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा सर्व तपशील या निवेदनामध्ये असणार आहे.

ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्षांना १६ आमदारांच्या अपात्रतेची संदर्भात ७९ पाणी निवेदन देणार आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा सर्व तपशील या निवेदनामध्ये असणार आहे. कोर्टाने जो निर्णय दिला आहे त्याच्या चौकटींमध्ये राहूनच निर्णय घाव अशी मागणी ठाकरे गटाने अध्यक्षांकडे करणार आहेत. परंतु सध्या विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्रामध्ये नसल्यामुळे ठाकरे गटाने आपल्या मागण्यांचे निवेदन उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना दिले आहे. सर्वाच्च न्यायालयाचा सत्तासंघर्षाचा निकाल आल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाकडून पुढची रणनीती ठरवली जात आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे १६ आमदारांच्या अपात्रेच्या संदर्भामध्ये निर्णय घेणार आहेत.

ठाकरे गटाच्या आमदाराने आज विधान भावनांमध्ये जाऊन हा निर्णय तुम्ही तातडीने घ्या यासंदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत जोडून त्यांनी निवेदन दिले आहे. अध्यक्ष राहुल नार्वेकर हे अनुपस्थित असल्याने विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना हे निवेदन देण्यात आले आहे. लवकरात लवकर अध्यक्षांनी याबाबतीत निर्णय घ्यावा अशा मागणीचे पत्र दिल्याचे ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी सांगितले आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हेच १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेणार आहेत. हा निर्णय लवकरात लवकर घ्यावा अशी ठाकरे गटाने मागणी केली आहे.

हे ही वाचा : 

युनेस्कोला बारसूमध्ये कातळ शिल्प सापडली

राज ठाकरेंनी केली मुंबई -गोवा महामार्गाची समृद्धी महामार्गासोबत तुलना

Raj Thackeray यांचा शरद पवरांवर निशाणा, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शरद पवार घेत नाहीत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss