Tuesday, June 6, 2023

Latest Posts

कोणाला मिळणार मंत्रिपद? मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? आमदारांनी मुंबई गाठली

राज्यामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार यांच्या तारखांवर तारखा समोर येत आहेत. मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असे मत आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale), संजय शिरसाट (Sanjay Shirsat) आणि बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी व्यक्त केले आहे.

राज्यामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार यांच्या तारखांवर तारखा समोर येत आहेत. मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असे मत आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale), संजय शिरसाट (Sanjay Shirsat) आणि बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी व्यक्त केले आहे. राज्यामध्ये मंत्रिमंडळ विस्ताराची घाई सुरु झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिंदेंना शिवसेना पक्षही मिळाला आणि चिन्ह ही मिळाले. परंतु अजुनपर्यत मंत्रिमंडळाचा विस्तार काही झाला नाही म्हणून आता सर्व शिवसेनेचे सर्व आमदार मुंबईमध्ये लॉबिंगसाठी ठाण मांडून आहेत.

१६ आमदारांच्या सुनावणीसंदर्भातही निर्णय आला आहे. त्यामुळे आता तरी मंत्रिमंडळाचा विस्तार व्हावा अशी अशा आहे. विस्ताराची तारीख अजुनपर्यत जाहीर झाली नसली तरी शिवसेनेचे आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे लॅाबिंग करत आहेत. पपाहील्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिवसेनेचे १० आणि भाजपच्या १० मंत्र्यांचा शपथविधी पार पडला होता. आता दुसऱ्या विस्तारात तरी आपला नंबर लागेल, या आशेवर बरेच शिवसेना आणि भाजप आमदार आहेत. त्यासाठी, काही आमदारांनी मुंबई गाठली आहे. मुख्यमंत्र्यांच्या नजरेसमोर राहण्याचं काम आमदारांकडून सुरू आहे.

मंत्रिपदासाठी इच्छुक असलेले शिवसेनेचे आमदार

 • भरत गोगावले
 • संजय शिरसाट
 • प्रताप सरनाईक
 • अनिल बाबर
 • प्रकाश आंबिटकर
 • संजय रायमूलकर
 • संजय गायकवाड
 • सदा सरवणकर
 • यामिनी जाधव
 • बच्चू कडू
 • बालाजी कल्याणकर
 • बालाजी किणीकर
 • सुहास कांदे
 • चिमणराव पाटील
 • बच्चू कडू
 • आशिष जैस्वाल
 • गीता जैन सारखे

मंत्रिपदासाठी इच्छुक असलेले भाजपचे आमदार

 • आशिष शेलार
 • प्रवीण दरेकर
 • मदन येरावार
 • संजय कुटे
 • संभाजी पाटील निलंगेकर
 • मेघना बोर्डीकर
 • देवयानी फरांदे
 • राणा जगजितसिंह पाटील
 • राहुल कुल
 • माधुरी मिसाळ
 • नितेश राणे
 • जयकुमार रावल

हे ही वाचा:

Manipur मध्ये माजी आमदाराने भडकवली दंगल, तब्बल ५ दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद

जयंत पाटलांना #ED चौकशीत घेऊन कोणाचा कार्यक्रम कोण करतंय? Who is targeting |

ईडीकडून नोटीस मिळाल्यावर शक्तिप्रदर्शन करण्याचा नवीनच पॅटर्न – संजय शिरसाट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss