Monday, June 5, 2023

Latest Posts

आकाश मधवालला मिळणार का भारतीय संघामध्ये स्थान, रोहितचे मोठे वक्तव्य

आयपीएल २०२३ (IPL 2023) चा एलिमिनेटर सामना पार पडला. कालच्या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) संघाने लखनौ सुपर जायंट्सचा (Lucknow Super Giants) ८१ धावांनी पराभव करून क्वालिफायर २ मध्ये प्रवेश केला आहे.

आयपीएल २०२३ (IPL 2023) चा एलिमिनेटर सामना पार पडला. कालच्या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) संघाने लखनौ सुपर जायंट्सचा (Lucknow Super Giants) ८१ धावांनी पराभव करून क्वालिफायर २ मध्ये प्रवेश केला आहे. कालच्या सामन्यामध्ये आकाश मधवालने Akash Madhwal) अप्रतिम गोलंदाजी करून मुंबई इंडियन्सला क्वालिफायर २ चे तिकीट मिळवून दिले. आकाश मधवालने मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स या एलिमिनेटर सामन्यामध्ये अवघ्या ३.३ षटकात ५ धावा देऊन ५ गडी बाद केले. आता कालची त्याची गोलंदाजी पाहून आकाशला भारतीय संघामध्ये आकाशला जागा मिळणार का? अशा चर्चा रंगल्या आहेत.

आकाश मधवाल हा उत्तराखंडाचा आहे आणि त्याचे वय २९ वर्ष आहे. कालच्या सामन्यामध्ये लखनौ सुपर जायंट्सचे फलंदाज आकाश आकाश मधवालच्या चेंडूंसमोर फेल झाले. कालची त्याची गोलंदाजी पाहून सर्वच चकित झाले आणि त्याने संपूर्ण देशाचे आणि अणे दिग्गजांचे लक्ष वेधले आहे. आकाशची गोलंदाजी पाहून भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit sharma) त्याच्या टीम इंडियाच्या एन्ट्रीचे संकेत दिले आहेत. कालचा सामना संपल्यानंतर रोहित शर्माने आकाशच्या गोलंदाजीवर मोठे विधान केले आहे.

आकाशचे कौतुक करताना रोहित म्हणाला की, आकाश मागील वर्षात आमच्या संघामध्ये सहाय्यक गोलंदाज म्हणून संघामध्ये सामील होता. जोफ्रा आर्चर गेल्यानंतर मला खात्री होती की आमच्या संघाला आवश्यक असलेली कौशल्ये आमच्या संघाकडे आहेत. अनेक वर्ष मी मुंबई इंडियन्सच्या संघामधून टीम इंडियाच्यामध्ये आलेले पहिले आहेत. तरुण खेळाडूंना संघातील सदस्यांसारखे वाटणे खूप महत्त्वाचे आहे. असे रोहित शर्मा म्हणाला.

कालच्या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सने लखनऊ सुपर जायंट्स ला १८३ धावांचे लक्ष दिले होते. मुंबई इंडियन्सचा फलंदाज कॅमेरून ग्रीनने २३ चेंडूंमध्ये सहा चुकार आणि एक शतकाच्या मदतीने ४१ धावा केल्या. गोलंदाजी करताना लखनौच्या नवीन-उल-हकने चार बळी घेतले. मुंबई इंडियन्सच्या या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौच्या फलंदाजांची बॅट फार वेळ काही टिकू शकली नाही. लखनौचे सर्व फलंदाज १०१ धावा करून बाद झाले. लखनौच्या मार्क स्टॉइनिसशिवाय एकही फलंदाजांला २० षटकांच्या आधीच ड्रेससिंग रूममध्ये पाठवले.

हे ही वाचा:

Arvind Kejriwal आले विरोधकांना जोडण्यासाठी, आज घेणार शरद पवारांची भेट

पुण्यात टिंबर मार्केटमध्ये अग्नितांडव, अग्निशमन दलाच्या ३० गाड्या घटनास्थळी

अवघ्या काही तासांत लागणार HSC चा निकाल, विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss