Friday, May 3, 2024

Latest Posts

Brijbhushan Singh यांच्यावर कारवाई होत नसल्याने कुस्तीपटूंनी केले मेडल्स विसर्जित

सध्या जंतरमंतर आंदोलनावर असलेले भारताचे कुस्तीपटू यांच्यामध्ये बराच वाद सुरु आहे. २८ मे रोजी त्याच्यासोबत झालेले वागणे सर्वानीच सोशल मीडियावर पहिले.

सध्या जंतरमंतर आंदोलनावर असलेले भारताचे कुस्तीपटू यांच्यामध्ये बराच वाद सुरु आहे. २८ मे रोजी त्याच्यासोबत झालेले वागणे सर्वानीच सोशल मीडियावर पहिले. हा वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. ओलंम्पिकमध्ये जाऊन देशाचे प्रतिनिधित्व करणे आणि देशासाठी पदक जिंकून आणणे. त्याचबरोबर त्या मेडलसाठी खेळाडू किती मेहनत करतात हे शब्दात सांगणे कठीण आहे. एकदा खेळाडू कित्येक रात्र आणि कित्येक दिवस ते यासाठी मेहनत करत असतात. परंतु या आंदोलनाला वैतागून आज भारतामधील खेळाडू ही सर्व पदक गंगा नदीच्या पात्रामध्ये विसर्जित करणार आहेत. या खेळाडूंनी खासदार ब्रृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत.

खेळाडूंनी ब्रृजभूषण सिंह यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी हे खेळाडू दीड महिन्यापासून करत आहेत. त्यांचे जंतरमंतर आंदोलन दीड महिन्यापासून सुरु आहे. परंतु केंद्र सरकारकडून कोणतीही कारवाई केली जात नाही त्यामुळे आंदोलक आक्रमक झाले आहेत. त्यामुळे त्यांनी आता आपले मेडल्स गंगा नदीमध्ये विसर्जित करण्याचे ठरवले आहे.

साक्षी मलिक, विनेश फोगाट, बजरंग पुनिया असे भारताचे दिग्गज कुस्तीपटू आज हरिद्वार येथे गंगा घाटावर दाखल झाले आहेत. ते तेथे गंगा नदीमध्ये आपले सर्व मेडल्स विसर्जित करणार आहेत. कुस्तीपटूंसाठी हा अतिशय कठीण प्रसंग आहे.अनेक आंदोलक कुस्तीपटू ओक्साबोक्शी रडत आहेत. ते मेडल्स गंगेत सोडण्यापूर्वी अत्यंत भावूक झाले आहेत. कुस्तीपटूंची अनेक वर्षाची तपश्चर्या आज ते पणाला लावत आहेत.

हे ही वाचा:

Vat Pournima 2023: वटपौर्णिमेनिमित्त अशा पद्धतीने सजवा पूजेचे ताट

“आदिपुरुष” चित्रपटातील गाणे झाले रिलीज, प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद

CSK vs GT, नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा धोनीचा निर्णय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss