Saturday, April 27, 2024

Latest Posts

World Enviroment Day निम्मित द्या पर्यावरणपूरक शुभेच्छा!

दरवर्षी ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन (World Environment Day) म्हणून साजरा केला जातो. प्रत्येकवर्षी एका विशिष्ट थीम वर पर्यावरण दिन साजरा केला जातो.

दरवर्षी ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन (World Environment Day) म्हणून साजरा केला जातो. प्रत्येकवर्षी एका विशिष्ट थीम वर पर्यावरण दिन साजरा केला जातो. ‘जागतिक पर्यावरण दिन २०२३’ ची थीम “बीट प्लास्टिक प्रदूषण” ( #BeatPlasticPollution) ही ठेवण्यात आली आहे.जागतिक पर्यावरण दिन (World Environment Day) हा दिवस म्हणजे सत्तरच्या दशकात सुरु झालेली संयुक्त राष्ट्राची सर्वात मोठी जागरूकता मोहीम आहे. पर्यावरण हे आपल्यासाठी तसेच आपल्या भविष्यासाठी फार महत्वाचे आहे. म्हणूनच जागतिक पर्यावरण दिन जागतिक पातळी वर साजरा करतात. जागतिक पर्यावरण दिन जगभरात दरवर्षी ५ जून रोजी साजरा केला जातो. पर्यावरणाचे संरक्षण करणारे व त्याची काळजी घेणारे अनेक पर्यावरणवादी घटक, संघटना, पर्यावरण प्रेमींकडून हा दिवस उत्सवात साजरा केला जातो. तर यंदाच्या पर्यावरण दिनानिम्मित द्या खास पर्यावरणपूरक शुभेच्छा.

पृथ्वीचे संवर्धन करू
पर्यावरणाला जपत भविष्य घडवू
जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा!

निर्सगाच्या देणगीचा सन्मान करूया
पर्यावरणाचे संवर्धन करूया
जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा!

श्वास घेतोय तोवर, जगून घ्यावं छान
झाडालाही कळत नाही, कोणतं गळेल पान
पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा!

आपल्याच भविष्याला तडा जाईल असे वागू नका
निसर्गामुळे आपण आहोत विसरू नका
पृथ्वीमातेचे संवर्धन करू
पर्यावरणाला जपून भविष्य घडवू
जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

पर्यावरण दिनाचा दिवस खास
निसर्ग रक्षणाचा घेऊन ध्यास
तुम्हा साऱ्यांच्या सहकार्याची आस
पृथ्वीला घेऊ देऊ श्वास
जागतिक पर्यावरण दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

पृथ्वीला, निसर्गाला तुमच्यासारखेच जगू द्या
तिच्यामुळे आपण जिवंत आहोत एवढं भान असू द्या
जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा!

हे ही वाचा : 

मविआ ची ‘वज्रमूठ’ सभा पुन्हा एकदा सुरू करणार, जयंत पाटील

Sharad Pawar यांनी बोलावली मविआ ची महत्वाची बैठक, जागा वाटपावर चर्चा होणार?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss