Monday, April 29, 2024

Latest Posts

PM नरेंद्र मोदीने केले “मन की बात” मधून देशाला संबोधित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' या रेडिओ कार्यक्रमाचा शंभरावा भाग आज प्रसारित होत आहे. हा सोहळा ऐतिहासिक होण्यासाठी सरकारकडून आणि भाजपाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. 'मन की बात' च्या शंभराव्या भागापूर्वी एक व्हिडीओ प्रसारित करण्यात आला आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमाचा शंभरावा भाग आज प्रसारित होत आहे. हा सोहळा ऐतिहासिक होण्यासाठी सरकारकडून आणि भाजपाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. ‘मन की बात’ च्या शंभराव्या भागापूर्वी एक व्हिडीओ प्रसारित करण्यात आला आहे, ज्यामध्ये ‘मन की बात’ कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग करताना कोणती तयारी केली जाते हे दाखवण्यात आलं आहे. हा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७ लोककल्याण मार्गावरील निवासस्थानी रेकॉर्ड केला जातो. आज पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचा 100 वा भाग ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनवर प्रसारित करण्यात येणार आहे. आणि ज्या मध्ये ‘मन की बात’चा पहिला भाग ३ ऑक्टोबर २०१४ रोजी प्रसारित झाला होता. तेव्हापासून हा रेडिओ कार्यक्रम दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी ११ वाजता प्रसारित केला जातो.

पंतप्रधान मोदींच्या मन की बातच्या शंभराव्या भागाचं देशातील राजभवनांमध्येही थेट प्रक्षेपण होणार आहे. मुंबईत राजभवनात होणाऱ्या 100 व्या भागाच्या प्रक्षेपण कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस आणि ‘मन की बात’ मध्ये उल्लेख झालेल्या व्यक्ती उपस्थित राहणार आहे. यामध्ये पद्म पुरस्कार विजेते, सामाजिक कार्यकर्ते, उद्योग समुदाय आणि चित्रपट उद्योगातील नामवंतांचा समावेश आहे. तर केंद्रीय मंत्री अमित शाह आणि पीयूष गोयल मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणांहून ‘मन की बात’चं थेट प्रक्षेपण पाहणार आहेत. ‘मन की बात’च्या १०० व्या भागाचा सोहळा साजरा करण्यासाठी गेटवे ऑफ इंडिया आणि देशभरातील विशेष महत्त्वाच्या 12 स्मारकस्थळांवर सांस्कृतिक कार्य मंत्रालयाकडून मोठ्या पडद्यांवर प्रक्षेपण केलं जाणार आहे. तसेच ‘मन की बात’चा १००वा भाग संस्मरणीय करण्यासाठी भाजप आणि सरकारने रोडमॅप तयार केला आहे. तो यशस्वी करण्यासाठी पक्षाच्या वतीने सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मन की बातचे प्रसारण ऐकण्यासाठी भाजपच्या सर्व खासदार आणि आमदारांनी विशेष व्यवस्था केली आहे. या अंतर्गत जास्तीत जास्त लोकांचा समावेश करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. सर्वसामान्यांपासून ते जाणकारांपर्यंत सर्वांची उपस्थिती असावी, अशी सूचना देण्यात आली आहे.

त्याचबरोबर भाजपच्या सर्व लोकसभा खासदारांना आपापल्या मतदारसंघातील निवडक ठिकाणी नागरिकांसह हे प्रसारण ऐकण्यास सांगण्यात आले आहे.एकाच वेळी जास्तीत जास्त लोकांनी ऐकण्याचा रेकॉर्ड बनवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आलं आहे.सर्व खासदार सुमारे १००० लोकांसह हे विशेष प्रसारण ऐकतील. पक्षाच्या अल्पसंख्याक आघाडीने देशभरात २१५० ठिकाणी हे प्रसारण ऐकण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी देशातील जनतेला काय संबोधणार या कडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा : 

तू तुझ्या बापाचं नाव किती लावतोस? नितीश राणेंचा संजय राऊतांना सवाल

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss