Thursday, May 2, 2024

Latest Posts

या विद्यार्थ्यांकडे आहे विशेष ज्ञान, पाहून थक्क व्हाल

सध्या सोशल मीडियावर दोन शाळकरी मुलांचा एक जबरदस्त व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हीनक्कीच आश्चर्यचकित व्हाल आणि म्हणाल एवढ्या लहान वयात त्यांच्याकडे एवढे ज्ञान कुठून आले? वास्तविक, दोन्ही मुलं महाभारतआणि रामायणाची 'गाथा' कथन करताना दिसतात.

मुंबई : हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर ब्योमकेश नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला आहे आणि कॅप्शन मध्ये लिहिलेआहे की, ‘हे भाई यार कोणती शाळा आहे, इथे मुलांना प्रवेश द्या’.व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी खूप छान कमेंट्सही केल्या आहेत. भारतात टॅलेंटची कमी नाहीए आणि सोशल मीडिया लोकांसाठी त्यांची कौशल्ये दाखवण्यासाठी एक उत्तम प्लॅटफॉर्म आहे. सध्यासोशल मीडियावर दोन शाळकरी मुलांचा एक जबरदस्त व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्ही नक्कीच आश्चर्यचकितव्हाल आणि म्हणाल एवढ्या लहान वयात त्यांच्याकडे एवढे ज्ञान कुठून आले? वास्तविक, दोन्ही मुलं महाभारत आणि रामायणाची’गाथा’ कथन करताना दिसतात. त्यातही ते अशा गोष्टी सांगत आहेत, ज्यांचे पूर्ण ज्ञान मोठ्या विद्वानांनाही नसेल. दोन्ही मुलांनारामाच्या सर्व पूर्वजांची नावे आठवतायत टेपरेकॉर्डर असल्याप्रमाणे श्वास न घेता त्यांची नावे सांगितली आहेत.

हेही वाचा:

प्रियंका आणि निक पुन्हा एकदा नव्या बाळाच्या तयारीत

भगवान रामाच्या वडिलांचे, दशरथाच्या वडिलांचे नाव सांगायला सांगितले तर कदाचित तुम्ही विचारात पडाल आणि सांगताही येणारनाही, पण या मुलांना रामाच्या पूर्वजांची नावे आठवतात. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की महाभारत आणि रामायणशी संबंधितकाही प्रश्न दोन्ही मुलांना विचारले जात आहेत, ज्याची ते श्वास न घेता उत्तर देत आहेत. प्रथम एका मुलाला महाभारताबद्दल विचारलेजाते, जसे की अर्जुनाला किती भाऊ होते, अर्जुनाचा गुरु कोण होता, द्रोणाचार्यांच्या मुलाचे नाव काय होते, वेद किती आहेत, किती युगेआहेत.

यानंतर पुन्हा दुसर्‍या मुलाचा नंबर येतो, जो सध्या केजी-2 मध्ये शिकत आहे, परंतु त्याला रामायणाबद्दल सर्व काही माहित आहे. त्याला विचारले जाते की भगवान रामाला किती भाऊ होते, त्यांच्या वडिलांचे नाव काय होते आणि त्यांच्या वडिलांचे नाव काय होते? मुल अगदी जलद वेगाने त्यांची नावे सांगत आहे. दोन्ही मुलं मिळून एक एक करून भगवान रामाच्या सर्व पूर्वजांची नावे सांगतात, जी ऐकून विचारणारा थक्क होतो.

Latest Posts

Don't Miss