spot_img
spot_img
Friday, September 22, 2023
spot_img
spot_img

Latest Posts

Father’s Day हा जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी का साजरा करतात फक्त एका क्लीकवर

फादर्स डे म्हणजे आपल्या प्रिय वडिलांचा दिवस. फादर्स डे हा पाशात्य संस्कृतीत साजरा केला जातो. मात्र मागील काही वर्षांपासून भारतात फादर्स डे अगदी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. हा दिवस आपल्या वडिलांना समर्पित करून मुलं आपल्या वडिलांसाठी काहीतरी नवीन करतात.

फादर्स डे म्हणजे आपल्या प्रिय वडिलांचा दिवस. फादर्स डे हा पाशात्य संस्कृतीत साजरा केला जातो. मात्र मागील काही वर्षांपासून भारतात फादर्स डे अगदी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. हा दिवस आपल्या वडिलांना समर्पित करून मुलं आपल्या वडिलांसाठी काहीतरी नवीन करतात. वडील आपल्या कुटुंबाचे आधारस्तंभ असतात. मुलांना वाढविण्यापासून ते आपल्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी आईवडील रात्रंदिवस कष्ट करतात. आपल्या मुलांनी सुखी समाधानात आयुष्य जगावं यासाठी हे दोघेही झटत असतात. मात्र या धावपळीच्या जीवनात मुलांना आपल्या आई वडिलांबद्दलचे प्रेम, माया, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वेळ मिळत नाही. यासाठी अमेरिकेने आई वडिलांसाठी वर्षातले दोन दिवस अधिकृतपणे निश्चित केले आहे. मे महिन्यातील दुसरा रविवार आईबद्दलच्या प्रेमासाठी समर्पित केला जातो हा दिवस मदर्स डे या नावाने केला जातो. तसेच आपल्या वडिलांसाठी जून महिन्यातील तिसरा रविवार हा फादर्स डे म्हणून साजरा केला जातो. बहुतेक घरामध्ये फादर्स डे हा केक कापून अथवा वडिलांना एखादी छानशी भेटवस्तू देऊन हा दिवस साजरा केला जातो.

अमेरिकेत १९१३ साली मदर्स डे ची घोषणा अधिकृतपणे करण्यात आली. त्यानंतर अनेक वर्षांनी म्हणजेच १९७२ साली फादर्स डे चे अधिकृतपणे घोषणा करण्यात आली. तरीही अमेरिकेतील त्याचप्रमाणे इंग्लंड मधील काही ठिकाणी मदर्स डे आणि फादर्स डे जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात साजरा केला जातो. मात्र जगात काही ठिकाणी फादर्स डे साजरा करण्यामागे वेगळे कारण असून वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो. युरोपमधील पोर्तुगाल, इटली त्याचप्रमाणे स्पेन या देशांमध्ये फादर्स डे हा १९ मार्च रोजी साजरा केला जातो. त्यामागील कारण म्हणजे या दिवशी सेंट जोसेफ यांचा जन्मदिवस असतो म्हणून हा दिवस फादर्स डे म्हणून साजरा केला जातो. त्याचप्रमाणे जे लोक जिजसला माता मानतात म्हणून तिच्या नवऱ्याचा जन्मदिवस म्हणून फादर्स डे साजरा करतात. त्याचप्रमाणे दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्लंडमध्ये फादर्स डे मोठ्या उत्साहात साजरा केला जाऊ लागला. त्यानंतर सर्वत्र फादर्स डे बद्दलचे महत्व पसरत गेले आणि जवळजवळ ७० देशांमध्ये जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जाऊ लागला.

अमेरिकेतील वोशिन्ग्टन येथील स्पॉकेन या शहरात सोनोरा डॉड यांनी आपल्या वडिलांच्या आठवणीत हा दिवस फादर्स डे म्हणून साजरा केला असे सांगितले जाते. त्यानंतर १९१६ साली अमेरिकेचे माजी राष्ट्रपती वुड्रो विल्सन यांनी फादर्स डे अधिकृतरीत्या साजरा करण्याचा प्रस्तावाला मंजुरी दिली होती. त्यानंतर १९६६ साली सर्वात पहिला फादर्स डे अधिकृतपणे साजरा केला गेला.

हे ही वाचा:

Adipurush चित्रपट रिलीज होण्याआधीच निर्मात्यांनी केली मोठी घोषणा, प्रत्येक थिएटरमध्ये…

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक रवी जाधव यांचा ‘बाल शिवाजी’चा फर्स्ट पोस्टर प्रदर्शित

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss