Friday, April 26, 2024

Latest Posts

World Milk Day 2023, का ‘या’ दिवशी साजरा करतात दूध दिवस ? जाणून घ्या थीम, इतिहास…

दूध हे आपल्या नियमित आहारातील महत्तवपूर्ण घटक आहे. कधी चहात मिसळून तर कधी कॉफीमध्ये मिसळून... नेहमीच कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपण नेहमी दुधाचे सेवन करतो. दुधामध्ये अनेक पोषकसत्त्व तसेच घटक असतात.

दूध हे आपल्या नियमित आहारातील महत्तवपूर्ण घटक आहे. कधी चहात मिसळून तर कधी कॉफीमध्ये मिसळून… नेहमीच कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपण नेहमी दुधाचे सेवन करतो. दुधामध्ये अनेक पोषकसत्त्व तसेच घटक असतात. जे आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. आपल्या जीवनात दुधाचे एक विशेष महत्व आहे. म्हणूनच लोकांना दूधाचं महत्त्व आणि आरोग्याप्रती असलेली गरज लक्षात यावी यासाठी जागतिक अन्न आणि कृषी संशोधन परिषदेने दिलेल्या निर्देशानुसार २००१ पासून भारतासह जगभरात जागतिक दूध दिन साजरा (World Milk Day) करण्यात येतो.

२००१ पासून प्रत्येकवर्षी १ जून हा दिवस जागतिक दूध दिन म्हणून साजरा केला जातो. व्यक्तीच्या आरोग्यासाठी आणि फिटनेससाठी दूध अत्यंत महत्त्वाचं आहे.
दूधात अनेक प्रकारचे पोषकसत्त्व असल्यामुळे दुधाचे सेवन केल्याने शरीराला मोठा फायदा होतो. यामुळेच दुधाचे महत्व प्रत्येकाला समजण्यासाठी जागतिक अन्न आणि कृषी संशोधन परिषदेने १ जून हा दिवस जागतिक दूध दिन म्हणून घोषित केला. जागतिक दूध दिवसाद्वारे लोकांना दुधाचं उत्पादन, दुधाच्या पौष्टिकतेचं महत्त्व आणि दुधाच्या विविध उत्पादनांसह याचं आर्थिक महत्त्व समजावलं जातं.

काय आहे दूध दिन २०२३ ची थीम –

गेल्या वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये या विशेष दूध दिनानिमित्त हवामान बदलाच्या संकटाकडे लक्ष वेधून घेणे आणि डेअरी उद्योग पर्यावरणावरील प्रभाव कसा कमी करू शकतो याकडे लक्ष वेधून घेणे अशी थीम जागतिक अन्न आणि कृषी संशोधन परिषदमार्फत ठेवण्यात अली होती. त्याच प्रमाणे या वर्षी देखील एक रंजक व लोकांना जागरूक करणारी थीम दूध दिनानिमित्त ठेवण्यात आली आहे. या वर्षी “पौष्टिक अन्न आणि उपजीविका प्रदान करताना दुग्धव्यवसाय पर्यावरणावरील त्याचा प्रभाव कसा कमी करते” यावर लक्ष केंद्रित करणे अशी आहे.

काय आहे जागतिक दूध दिनाचा इतिहास –

अनेक देशांमध्ये १ जून रोजीच दुग्ध दिवस साजरा केला जात असे. हीच गोष्ट विचारात घेऊन २००१ सालापासून १ जून या तारखेलाच भारतात सुद्धा दूध दिन साजरा करतात. जागतिक अन्न आणि कृषी संशोधन परिषदेच्या निर्देशानुसार या दिवसाची सुरवात झाली. जागतिक दूध दिवसामार्फत लोकांना दुधाचं उत्पादन, दुधाच्या पौष्टिकतेचं महत्त्व तसेच दुधाच्या विविध उत्पादनांसह याचं आर्थिक महत्त्व समजावलं जातं. दरवर्षी दूध मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. प्रत्येकवर्षी एखादी विशिष्ट थीम द्वारे जागतिक पातळीवर लोकांना जागरूकतेचे संदेश दिले जातात.

काय आहे दुध सेवनाचे फायदे –

निरोगी राहण्यासाठी दूध एक चांगला पर्याय आहे. दुधात अनेक पोषक घटक असतात. दुधात अनेक प्रकारचे प्रथिने असतात. ज्याचा आपल्या आरोग्यावर चांगला फायदा होतो. दुधामुळे पचनाच्या अनेक समस्या दूर होतात. वजनकमीकरण्या साठी देखील दूध फायदेशीर ठरते. दुधामध्ये कॅल्शिअम (Calcium) प्रचंड प्रमाणात असते. त्यामुळे दुधाचे सेवन केल्याने हाडे फ्रॅक्चर आणि ऑस्टिओपोरोसिस (Osteoporosis) सारख्या आजारांपासून बचाव होतो. दूध प्यायल्याने हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोका सुद्धा कमी होण्यास मदत होते.

हे ही वाचा:

Coconut Water Face Spray ने करा नियमित Skin Care, त्वचा ही उजळेल…

South Actor Harish Pengan यांनी वयाच्या ४९ वर्षी घेतला अखेरचा श्वास

संजय शिरसाट यांना पोलिसांकडून दिलासा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss