Thursday, May 2, 2024

Latest Posts

मराठा आरक्षणासाठी निघालेले मनोज जरांगे काही तासांत मुंबईमध्ये पोहचणार

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. त्यांच्यासोबत लाखोंच्या संख्येने मराठा बांधव मुंबईच्या दिशेने येत आहेत. पुढील काही तासांतच मनोज जरांगे मुंबईमध्ये दाखल होणार आहेत. त्यांच्या या आंदोलनात ठिकठिकाणी अनेक मराठा आंदोलक सहभागी झाले आहेत. लाखोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने आल्याने सरकारकडून चिंता व्यक्त केली जात आहे. आज मराठा आंदोलक आज पावणे सातच्या सुमारास लोणावळ्यात पोहचणार आहेत. मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक असल्याने जरांगेंनी आंदोलन थांबवावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

गेल्या अनेक तासांपासून मराठा बांधव मला भेटण्यासाठी थांबले आहेत, त्यांना भेटल्याशिवाय मी जाऊ शकत नाही. हे लोकच माझी ताकत आहे. आतापर्यंत माझ्यासोबत या मोर्चामध्ये जवळपास ७० ते ८० लाख लोक आहेत. मोजता येणार नाहीत अशा पद्धतीने मराठा बांधव या मोर्चात सहभागी होत आहेत.२६ तारखेला आम्ही मुंबईला पोहोचणार आहे. आता जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. न्यायालयात जाण्याचा अधिकार आम्हालाही आहे. आमचे वकील आमची बाजू मांडतील. कोणत्याही नियमांचे उल्लंघन केलेला नाही. आम्हाला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे,असे मनोज जरांगे म्हणाले.

गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे यांच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यानंतर हायकोर्टात सुनावणी पार पडली. त्यानंतर हायकोर्टाने मनोज जरांगे यांना नोटीस बजावली आहे. मुंबईमध्ये पोहचेपर्यंत तीन कोटी मराठा आंदोलक सहभागी होणार आहे. २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिवस असल्यामुळे संपूर्ण प्रशासन अलर्ट मोडवर आहे. मुंबई लोकल आणि वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. कायदा-सुव्यवस्था, सामाजिक शांतता भंग होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या सर्व मुद्द्यांमुळे गुणरत्न सदावर्तें यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावेळी कोर्टाने कायदा आणि सुव्यस्था राखणं ही राज्य सरकारची जबाबदारी आहे,असे सांगत मनोज जरांगे यांना नोटीस पाठवली आहे.

हे ही वाचा:

NATIONAL VOTERS DAY निमित्त उत्कृष्ट कार्य केलेल्या व्यक्तींचा गौरव संजय लीला भन्साळी यांच्य आगामी चित्रपटात आलिया,रणबीर आणि विकी झळकणार,नावाची केली घोषणा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss