Tuesday, April 30, 2024

Latest Posts

त्र्यंबक प्रकरणावर राज ठाकरे काय म्हणाले ? विरोधकांना चांगलेच खडसावले

त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये झालेल्या प्रकरणी अनेक राज्यातून यावर अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्या. त्र्यंबक ठिकाणी झालेल्या प्रकरणातून नवीन वादाला सुरवात झाली. आणि पुन्हा राजकारणी लोकांनी या मुद्द्याकडे लक्ष वेधले गेले. परंतु या प्रकरणी १३ मे रोजी घडलेल्या गोष्टीवरून वाद निर्माण झाला होता. मात्र या वादातून त्यानंतर काही उरुस आयोजकांनी पुढच्या वर्षीपासून त्र्यंबकेश्वराला धूप न दाखवण्याचा निर्णय घेतला. या मंदिराच्या मुद्द्यावरून जे काही घडलं त्यावरुन राजकारण आणि आरोप-प्रत्यारोप झाले होते. याच बाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भाष्य केलं आहे.

नाशिक येथील त्र्यंबक प्रकरणावरून राजकारण्यांनीही या वादात मुद्दामून उडी घेतली. आणि नेहमी प्रमाणे सामान्यांच्या प्रश्नाकडे दुलक्ष करून सरकार जाणूंबाजूं जातीय आणि धर्मीय प्रश्नांना डोक्यावर उचलून घेत आहे.राज ठाकरे यांनी या संदर्भात भाष्य करताना “मला वाटतं की परंपरा वर्षानुवर्षे सुरु असेल तर ती थांबवण्यात काही अर्थ नाही. तसंच हा जो काही विषय आहे तो संस्थांनाचा आणि गावकऱ्यांचा विषय आहे. राजकारणी लोकांनी लक्ष न आलेलेच बरे. तसेच महाराष्ट्रात अशी अनेक मंदिरं आहेत किंवा अशा मशिदी आहेत जिथे हिंदू-मुस्लीम एकोप्याने राहतात. त्यामुळे जातीय आणि धर्मीय वाद निर्माण करू नये. माहीमचा दर्गा आहे मकदुमबाबांचा तिथे उरुस असताना जी चादर चढवतात ती माहीम पोलीस स्टेशनचा कॉन्स्टेबल ती चढवतो. अशी अनेक उदाहारणं राज ठाकरे यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेतून दिली आहे,मला वाटतं जे परंपरा सुरु ठेवली पाहिजे. इतर धर्माचा माणूस आपल्या मंदिरात आला तर इतका भ्रष्ट होणारा इतका कमकुवत धर्म आपला आहे का? असा सवाल सुद्धा राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. याआधी मी देखील दर्गा, मशिदींमध्ये गेलो आहे. मुस्लिम लोकंही मंदिरात येतात. आपलीच काही मंदिरं अशी आहेत जिथे काही जातींनाच गाभाऱ्यात जाऊ दिलं जातं.

मला वाटतं की या प्रकरणी जे वाद निर्माण केला आहे त्या माणसांची वृत्ती भ्रष्ट झाली आहे. त्र्यंबकेश्वरच्या गावकऱ्यांनी हा निर्णय घ्यायचा आहे. इतरांनी त्यात पडू नये, बाहेरच्या लोकांनी पडायची गरज नाही. यामध्ये कुणाला दंगली हव्या आहेत का? मी लाऊडस्पीकरचा विषय काढला, समुद्रातल्या दर्ग्यावर बोललो होतो, जे चुकीचं आहे तिथे कारवाई केलीच पाहिजे. गड-किल्ल्यांवर दर्गे आहेत ते हटवले गेलेच पाहिजेत तिथे त्यांचा काय संबंध? चुकीच्या गोष्टींवर प्रहार केलाच पाहिजे. पण जाणूनबुजून काहीतरी खोदून काढायचा त्याला काही अर्थ नाही. आणखी एक महत्त्वाचं, मराठी मुसलमान जिथे राहतात तिथे कधीच दंगली होत नाहीत. त्यांचं सगळं बालपण, पिढ्या इकडे राहिलेल्या असतात. त्यामुळे अशा प्रकारे जे सामंज्यस आहे ते काही लोकांनी बिघडवू नये.” असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

हे ही वाचा : 

मोदी सरकारकडून अर्थव्यवस्थेचा केला जातोय खेळखंडोबा – संजय राऊत

कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री सिद्धरमय्या,उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार घेणार शपथ

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss