Tuesday, April 30, 2024

Latest Posts

तुम्हाला माहित आहे का LKG आणि UKG चा अर्थ? जाणून घ्या फक्त एका क्लिकवर

मे महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू झाल्यावर मुलांना शाळेची ओढ लागते. लहान मुलांच्या पालकांना मुलांच्या ऍडमिशन (Admission) चिंता होत असते. उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपत आपल्या की पालकांची मुलांच्या ऍडमिशन साठी लगभग सुरु होते. लहान मुलांना शाळेची आवड निर्माण होण्यासाठी त्यांना शाळेत पाठवले जाते.

मे महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू झाल्यावर मुलांना शाळेची ओढ लागते. लहान मुलांच्या पालकांना मुलांच्या ऍडमिशन (Admission) चिंता होत असते. उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपत आपल्या की पालकांची मुलांच्या ऍडमिशन साठी लगभग सुरु होते. लहान मुलांना शाळेची आवड निर्माण होण्यासाठी त्यांना शाळेत पाठवले जाते. लहान मुलं हि पहिल्यांदा नर्सरीत जातात. नर्सरी संपल्यानंतर पालक या लहान मुलांचे एलकेजी आणि यूकेजी मध्ये ऍडमिशन घेतात. या मुळे त्या लहान मुलांना शाळेबद्दल आवड निर्माण होते. या एलकेजी आणि यूकेजी मध्ये मुलांना बऱ्याच गोष्टी शिकवल्या जातात. यामध्ये त्यांना चित्र काढायला, गाणी गायला, डान्स करायला अश्या अनेक मजेशीर गोष्टी शिकवल्या जातात. या सगळ्या ऍक्टिव्हिटीज (activities) सोबतच त्यांना अक्षरांची, अंकांची ओळख, वेगवेगळ्या प्राण्यांची, फुलांची फळांची ओळख करून देतात. आणि या मुळेच लहान मुलांनां पालकांपासून काही तास दूर राहण्याची सवय लागते. पण तुम्हाला या LKG आणि UKG चा संपूर्ण अर्थ माहित आहे? चला तर मग आज आम्ही तुम्हाला या LKG आणि UKG शब्दांचा नेमका अर्थ सांगणार आहोत.

किडरगार्डेन चा अर्थ काय: (What is the meaning of Kindergarden)

किंडरगार्डनमध्ये मुलांना छानशा गोष्टी शिकवल्या जातात. त्यांच्या वर अभ्यासाचे वजन न टाकता त्यांना अक्षरांची ओळख अंकांची ओळख,कविता पाठांतर या गोष्टी मजेशीर पद्धतीने शिकल्या जातात. हसतखेळत शिकलेल्या गोष्टी या लहानमुलांच्या लगेच लक्षात राहतात. त्यांच्यावर कसलाही भर न देता त्यांना प्राण्यांची थोडक्यात माहिती त्यांचे आवाज याबद्दल कल्पना दिली जाते. किंडरगार्डेनमध्ये मुलांसाठी खेळणी, बाग असते. त्यांना खेळ्यांतून शिकविले जाते. शिक्षकही त्यांच्या सोबत लहान मुलं होऊन खेळतात व त्यांना नवीन गोष्टी शिकवतात. किंडरगार्डेन मध्ये सुद्धा २ प्रकार असतात ते म्हणजे LKG आणि UKG.

एलकेजी चे पूर्ण रूप काय (What is the full form of LKG)

प्ले ग्रुप (Play Group) आणि नर्सरी नंतर पालक आपल्या मुलांचे एलकेजी ला ऍडमिशन घेतात. नर्सरी नंतरचा पुढचा वर्ग म्हणजे एलकेजी. LGK चे पूर्ण रूप हे लोवर किंडरगार्डन (Lower Kindergarten) असे आहे. या वर्गात मुले ही काही मजेशीर गोष्टी शिकतात ज्या अवघडही नसतात आणि समजून घ्यायला सोप्प्या असतात. या वर्गात लहान मुले ही कविता पाठ करायला शिकतात, रेखा काढण्यास शिकतात, एखाद्या प्राण्याचे, पक्षाचे, फुलांचे चित्र ओळखण्यास शिकतात. या मजेशीर गोष्टी मुलांना करायला खूप आवडतात. लोअर किंडरगार्डेन च्या माध्यमातून चित्रांचे फोटो, चित्रांचे ठोकळे याच्या साहाय्याने सुद्धा मुलांना चित्र ओळखण्यासाठी LKG मधून प्रयत्न केले जातात.

यूकेजी चे पूर्ण रुप काय? (What is the full form ऑफ UKG)

UKG चे पूर्ण रूप अप्पर किडरगार्डन (Upper Kindergarden) असे आहे. या वर्गात सुद्धा मुले फन ऍक्टिव्हिटीइज (Fun Activities) शिकतात. LKG चा वर्ग पूर्ण झाल्यावर मुले या वर्गात प्रवेश घेतात. या वर्गात शिकल्यामुळे मुलांना आपल्या पालकांपासून, आपल्या घरापासून काही वेळ दूर राहण्याची देखील सवय होते. यामध्ये लहान मुलांना छान छान बालगीते शिकविली जातात. प्रत्येक सण अगदी धुमधडाक्यात साजरे केले जातात. छान छान गाण्यांवर मुलांचे डान्स बसविले जातात. या वर्गात मुलांवर संस्कार सुद्धा होतात आणि मुलांनां शिस्त देखील लागते. युकेजी मध्ये मुलं हे लिहिण्यास देखील सुरवात करतात. यामध्ये त्यांना अक्षरांची ओळख पटवून दिली जाते व तसेच त्यांच्या कडून लिहिण्याचा सराव करून घेतला जातो.

हे ही वाचा:

या देशाला एक लहरी राजा मिळाला, संजय राऊत

… आणि सुयोगने मला किस केलं, रसिका सुनील

या देशाला एक लहरी राजा मिळाला, संजय राऊत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss