Tuesday, April 30, 2024

Latest Posts

Purple Cap आणि Orange Cap वर गुजरातच्या खेळाडूंचा कब्जा

आयपीएल २०२३ हा सिझन ब्लॉकबस्टर ठरला आहे. प्लेऑफच्या लढतीत सर्व संघ शेवटपर्यत लढत होते. बऱ्याच फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला तर काही गोलंदाजांनी फलंदाजांची बॅटच चालू दिली नाही.

आयपीएल २०२३ हा सिझन ब्लॉकबस्टर ठरला आहे. प्लेऑफच्या लढतीत सर्व संघ शेवटपर्यत लढत होते. बऱ्याच फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला तर काही गोलंदाजांनी फलंदाजांची बॅटच चालू दिली नाही. इंडियन प्रीमियर लीगमध्ये सर्वात जास्त धावा करणाऱ्या खेळाडूला ऑरेंज कॅप दिली जाते तर सर्वात जास्त विकेट्स घेणाऱ्या खेळाडूला पर्पल कॅप दिली जाते. यंदाचा या शर्यतीमध्ये अनेक खेळाडूंमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली.

आयपीएल २०२३ मध्ये ऑरेंज कॅपच्या लढतीत अव्वल स्थानावर गुजरात टायटन्सचा शुभमन गिल आहे. शुभमन गिलने १६ सामन्यांमध्ये ८५१ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने आयपीएल २०२३ च्या सीझनमध्ये ३ शतके झळकावली आहेत. त्यानंतर या शर्यतीत दुसऱ्या स्थानावर रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा कर्णधार फाफ डू प्लेसी आहे. फाफ डू प्लेसीने १४ सामन्यांमध्ये ७३० धावां केल्या आहेत. त्याच्याच खाली भारताचा फलंदाज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा माजी कर्णधार विराट कोहली तिसऱ्या स्थानावर आहे. विराट कोहलीने १४ सामन्यांमध्ये ६३९ धावा केल्या आहेत. त्यानंतर राजस्थानचा यशस्वी जैस्वाल चौथ्या क्रमांकावर आहे. यशस्वीने १४ सामन्यांमध्ये ६२५ धावा केल्या आहेत. चेन्नई सुपर किंग्सचा डेवोन कॉनवे पाचव्या स्थानावर आहे. कॉनवेने १५ सामन्यांमध्ये ६२५ धावा केल्या आहेत.

आयपीएलमध्ये सर्वात जास्त विकेट्स घेणाऱ्या खेळाडूला पर्पल कॅप दिली जाते. ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप या दोन्ही कॅपवर गुजरात टायटन्सच्या खेळाडूंनी कब्जा केला आहे. पर्पल कॅपच्या शर्यतीत प्रथम क्रमांकावर गुजरातचा मोहम्मद शमी आहे आतापर्यत मोहम्मद शमीने २८ विकेट्स घेतले आहेत. त्याच्या खाली त्याचाच साथीदार राशिद खान २६ विकेट्स घेऊन दुसऱ्या क्रमांकावर आहे. क्वालिफायर २ च्या सामन्यांमध्ये ५ विकेट्स घेणारा मोहित शर्मा या शर्यतीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. मोहित शर्माने आतापर्यत २४ विकेट्स घेतले आहेत. चौथ्या क्रमांकावर मुंबई इंडियन्सचा पियुष चावला आहे. पियुष चावलाने आतापर्यत २२ विकेट्स घेतले आहेत. राजस्थान रॉयल्सचा फिरकी गोलंदाज युझवेंन्द्र चहल पाचव्या क्रमांकावर आहे. आज इंडियन प्रीमियर लीग २०२३ चा फायनलचा सामना रंगणार आहे आणि सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष या महाअंतिम सामन्याकडे लागले आहे. कोणता संघ यंदाच्या ट्रॉफीवर नाव कोरणार याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा:

IPL 2023, चेन्नईचा संघ अंतिम सामन्यात तर गुजरात खेळणार क्वालिफायर २ चा सामना

जाणून घ्या आयपीएल २०२३ नंतर टीम इंडियाचे वेळापत्रक

Gujrat Titans ला मिळवून दिले शुभमन गिल आणि मोहित शर्माने अंतिम फेरीचे तिकीट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss