Tuesday, April 30, 2024

Latest Posts

Cannes Film Festival 2023 आहे ‘या’ तारखेला, तिकिटांच्या किंमती ऐकून व्हाल थक्क

कान्स फिल्म फेस्टिवल (Cannes Film Festival) हा जगातील सर्वात मोठ्या फिल्म फेस्टिवलपैकी एक आहे. कान्स फेस्टिवलमध्ये जगभरातील अनेक मोठमोठे कलाकार हजेरी लावतात. आपल्या भारतातूनदेखील अनेक सेलिब्रिटीज या फेस्टिवलमध्ये हजेरी लावतात. तसेच यावर्षी सुद्धा कान्स फेस्टिवलच आयोजन होणार आहे.

कान्स फिल्म फेस्टिवल (Cannes Film Festival) हा जगातील सर्वात मोठ्या फिल्म फेस्टिवलपैकी एक आहे. कान्स फेस्टिवलमध्ये जगभरातील अनेक मोठमोठे कलाकार हजेरी लावतात. आपल्या भारतातूनदेखील अनेक सेलिब्रिटीज या फेस्टिवलमध्ये हजेरी लावतात. तसेच यावर्षी सुद्धा कान्स फेस्टिवलच आयोजन होणार आहे. भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी अनेक कलाकार या फिल्म फेस्टिवलसाठी जाणार आहे. भारतीय कलाकारांना जगातील सर्वात मोठ्या फिल्म फेस्टिवलपैकी एक असणाऱ्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर बघताना खूप अभिमान वाटणार आहे. चला तर मग जाणून घेऊया या कान्स फिल्म फेस्टिवल बद्दल अधिक माहिती.

कान्स फिल्म फेस्टिवलची सुरुवात कशी व कुठे झाली?

कान्स फिल्म फेस्टिवलचे अधिकृत नाव हे फेस्टिवल दे कान्स (Festival de Cannes) आहे. हा फिल्म फेस्टिवल दरवर्षी फ्रान्समध्ये असलेल्या कान्स या शहरात आयोजित केले जाते. कलात्मक कामगिरीच्या मान्यतेसाठी १९४६ मध्ये पहिल्यांदा आयोजित करण्यात आलेला हा महोत्सव चित्रपटांच्या कला आणि प्रभावामध्ये स्वारस्य असलेल्यांना पुरस्कार देण्यासाठी सुरु झाला. या फेस्टिवलमध्ये जगभरातील सर्व शैलीतील नवीन चित्रपटांचे व माहितीपटांचे पूर्वलोकन केले जाते.

कान्स फिल्म फेस्टिव्हलची २०२३ कधी व कुठे सुरु होणार?

दरवर्षीप्रमाणे यंदाही कान्स फिल्म फेस्टिवलचे आयोजन करण्यात येणार आहे. यंदा कान्स फिल्म फेस्टिवलचे ७६व्या वर्षात पदार्पण होणार असून याकडे सर्वांचे लक्ष हे लागले आहे. यावर्षी या फिल्म फेस्टिवल श्री गणेश १६ मे ला होणार आहे. कान्स फिल्म फेस्टिवल हा १६ मे पासून सुरु होऊन २७ मे पर्यंत असणार आहे. या फेस्टिवलला जगभरातील सिनेसृष्टीतले मोठमोठे कलाकार उपस्थित राहणार आहेत. हॉलिवूड पासून ते बॉलीवूड पर्यंत सर्वच अभिनेते, अभिनेत्री रेड कार्पेटवर अवतरणार आहेत. या लोकप्रिय फिल्म फेस्टिवलचे आयोजन यावर्षी फ्रांस येथील फ्रेंच रिवेरा येथे होणार असून आपली भारतीय कलाकार मंडळी सुद्धा उपस्थित राहणार आहेत. या फिल्म फेस्टिवल ने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये सहभागी होणाऱ्या कलाकाराची यादी

कान्स फिल्म फेस्टिव्हलची गणना ही सर्वात मोठ्या फिल्म फेस्टिवलमध्ये केली जाते. या फेस्टिवलला सिनेविश्वातील अनेक कलाकार उपस्थित राहतात. भारतीय कलाकारही या फेस्टिवलसाठी जातात. यावर्षी अनेक भारतीय कलाकार या फिल्म फेस्टिवलला उपस्थित राहणार आहेत. यंदा कान्स फिटलं फेस्टिवल २०२३ मध्ये बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka sharma ) आणि आपली मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर (Manushi Chhillar ) सुद्धा उपस्थित राहणार आहे. कान्स फिल्म फेस्टिवलच्या ज्युरी मध्ये अमेरिकन अभिनेत्री ब्री लार्सन, फ्रेंच अभिनेता डेनिस मोनोशेट, अमेरिकन अभिनेता-दर्गदर्शक पॉलो डॅनो, त्यांच्यासोबतच ब्राझिलियन चित्रपट निर्माता रुंगानो न्योनी, व अफगाणी लेखक- दिग्दर्शक अतिक राहिमी, मोरोक्कन चित्रपट दिग्दर्शक मॅरियम तोझानी, चित्रपट डॅमियन साफरों, फ्रेंच दिग्दर्शिका ज्युलिया डुकोरानु यांचा समावेश आहे.

कान्स फिल्म फेस्टिवलच्या तिकिटांची किंमत?

कान्स फिल्म फेस्टिवलच्या तिकिटांची किंमत हि लाखो रुपयात मोजली जाणार आहे. या फेस्टिवल मध्ये कलाकार यांचा समावेश असणारच आहे परंतु सेलिब्रिटी पत्रकार व चित्रपट समीक्षक याना हि या फिल्म फेस्टिवलच्या भाग होता येणार आहे परंतु या फिल्म फेस्टिवलच्या भाग होण्यासाठी त्यांना लाखो रुपये मोजावे लागणार आहेत. हे लाखो रुपये खर्च करून त्यांना कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये सहभागी होता येणार आहे. या फिल्म फेस्टिव्हलची किंमत ही ५ लाख रुपये ते २० लाख रुपये असून या फिल्म फेस्टिव्हलची तिकिटे हि त्यांच्या अधिकृत वेबसाईट वरून ऑनलाईन बुक करता येऊ शकतात.

हे ही वाचा : 

Parineeti-Raghav चा रॉयल साखरपुडा, गाणं गात दिले सरप्राईज

Mothers Day 2023, आईच्या साडीतही जाणवते आईच्या प्रेमाची उब; ‘Aai Kuthe Kay Karte’ च्या प्रोमोने केलं भावुक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो कर.

Latest Posts

Don't Miss