Friday, April 26, 2024

Latest Posts

कमल हसन यांचा “द केरला स्टोरी” चित्रपटाला विरोध

"द केरला स्टोरी" चित्रपट हा रिलीज झाल्यापासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे. या चित्रपटाला अनेक लोकांनी विरोध केला आणि अनेकांनी या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव देखील केला.

“द केरला स्टोरी” चित्रपट हा रिलीज झाल्यापासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे. या चित्रपटाला अनेक लोकांनी विरोध केला आणि अनेकांनी या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव देखील केला. वादाच्या भोवऱ्यात अडकलेला या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली. अनेक राज्यांमध्ये या चित्रपटावर बंदी देखील घालण्यात आली होती. परंतु कोर्टाच्या निर्णयानंतर या चित्रपटावरची बंदी हटवण्यात आली. मोठ्या वादानंतर द केरळ स्टोरी हा चित्रपट 5 मे रोजी रिलीज झाला. “द केरला स्टोरी” चित्रपटाला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळत आहे.

“द केरला स्टोरी” चित्रपटाने धमाकेदार सुरुवात करत अनेकांना मोठा धक्का दिला. या चित्रपटाला सातत्याने अजूनही मोठा विरोध केला जात आहे. प्रसिद्ध अभिनेते कमल हासन यांनी मोठे भाष्य केले आहे. ते “द केरला स्टोरी” चित्रपटाबद्दल म्हणाले की, मी तुम्हाला सांगितले की हा चित्रपट एक प्रोपगंडा चित्रपट आहे, ज्याच्या मी विरोधात आहे. सत्य स्टोरी लिहिणे पुरेसे नाही. ते खरोखर खरे असले पाहिजे आणि ते खरे नाही.

मागील बऱ्याच वर्षांपासून कमल हसन हे राजकारणामध्ये सक्रिय आहेत. कमल हसन हे अभिनेते आणि राजकारणामध्ये सक्रिय असल्यामुळे त्यांचा चाहता वर्ग हा अत्यंत मोठा आहे. बरीच ठिकाणी “द केरला स्टोरी” चित्रपटाला विरोध करण्यात येत आहे. चित्रपटाच्या सपोर्टमध्ये अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट देखील शेअर केल्या आहेत.

हे ही वाचा:

IPL 2023, चेन्नईचा संघ अंतिम सामन्यात तर गुजरात खेळणार क्वालिफायर २ चा सामना

जाणून घ्या आयपीएल २०२३ नंतर टीम इंडियाचे वेळापत्रक

Gujrat Titans ला मिळवून दिले शुभमन गिल आणि मोहित शर्माने अंतिम फेरीचे तिकीट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss